मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. यासाठी ओबीसी आंदोलकांनी उपोषण करत आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे जालना जिल्ह्यातील वडी गोद्री या ठिकाणी उपोषण करत आहेत. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत. या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ जात आहे. 5 मंत्र्यांसह 12 जणांचं शिष्टमंडळ वडी गोद्री या ठिकाणी जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळावर हे शिष्टमंडळ दाखल झालंय. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसेना शिंदे गटातील मंत्री देखील सरकारच्या या शिष्टमंडळात दाखल झालेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा तातडीने जळगावहून वडीगोदरीकडे रवाना झाले आहेत. पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर गुलाबराव पाटील तातडीने वाहनाने वडीगोद्रीकडे रवाना झाले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ हे आज वडीगोद्री गावात जात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी गुलाबराव पाटील यांना सुद्धा फोन करून वडीगोद्री गावात जाण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुलाबराव पाटील तातडीने जळगाव येथून वडीगोद्री येथे वाहनाने रवाना झाले आहेत.
सरकारच्या शिष्टमंडळा मंडळासोबत मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा वडी गोद्री येथे लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत. वडीगोद्री येथील भेटीनंतर मंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा सायंकाळी जळगावच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी हजर राहणार आहेत.
सरकारचं शिष्टमंडळच्या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, गुलाबराव पाटील यांच्यासह इतर नेते या उपोषण स्थळी दाखल झालेत. सरकारचं हे शिष्टमंडळ आता ओबीसी आंदोलकांशी संवाद साधणार आहेत. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनासंदर्भात सरकारची काय भूमिका आहे? याची माहिती हे शिष्टमंडळ देणार आहे. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी संवाद साधणार आहे.