जळगाव | 14 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. आपण जिंकणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा दावा करण्यात येतोय. काहीच दिवसांआधी ॲड. ललिता पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समर्थकांसहीत पक्षप्रवेश केला. जळगावमधून लोकसभेसाठी ललिता पाटील या उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. आता ललिता पाटील यांनी हा मतदरासंघ जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या ॲड.ललिता पाटील यांची जळगाव लोकसभा मतदार संघातून तयारी सुरू केली आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी ॲड. ललिता पाटील इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष उध्दव ठाकरे यांची भेट घेवून परतल्यावर ललिता पाटील यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठकांचा धडाका सुरू केला आहे. पहिल्यांदा मिळलेल्या संधीच शिवसेना ठाकरे गट सोनं करणार आणि जळगाव लोकसभा मतदार संघातून इतिहास घडवणार , असा विश्वास ललिता पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव, अमळनेर या तालुक्यांमध्ये ॲड. ललिता पाटील दौरे करत आहेत. त्यांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात ललिता पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर ललिता पाटील यांनी तयारी सुरू केल्याचं बोलले जात आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून इतिहास घडवणार असा विश्वास ललिता पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कालच भाजपने दुसरी मतदार यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. यात जळगाव लोकसभेतून स्मिता वाघ यांना उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे. अशात जर महाविकास आघाडीने आणि विशेष करून ठाकरे गटाने जर ललिता पाटील यांना उमेदवारी दिली तर या दोन महिला नेत्यांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.