जळगावः सध्याच्या जगात आरोग्याबाबत अनेक नागरिक प्रचंड जागरूक झाले आहेत. कधी शरीर सौष्ठव तर कधी मॅरेथॉन, कधी धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या स्पर्थेला हौस-नवसे-गवसे असे जण अशा स्पर्धेत भाग घेतात. अशीच एक जळगावमध्ये स्पर्धा पार पडली. मात्र या स्पर्धेतील एका दांपत्यामुळे मात्र खान्देश रन मॅरथॉन स्पर्धा वेगळी ठरली आणि चर्चेचीही झाली. कारण होतं नागोराव शेषराव भोयर आणि त्यांची पत्नी शारदा भोयर यांच्या सहभागामुळे. जळगाव रनर्स ग्रुपतर्फे रविवारी ‘खान्देश रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतं.
या मॅरेथॉनसाठी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या उदारनिर्वाहासाठी आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी भोयर दांपत्य धावत होतं, आणि त्यांनीच धावता धावता ही स्पर्धेत नागोराव भोयर यांनी पहिल्या क्रमांकावर बाजीही मारली.
नागोराव भोयर यांनी पहिला क्रमांक मिळवला ती गोष्ट विशेष असली तरी त्यांच्या वयोमर्यादेच्या दृष्टीने त्यांनी जो पहिला क्रमांक घेतला आह तो मात्र वाखणण्याजोगा आहे. नागोराव भोयर यांचे वय आहे, 58 वर्षे. या वयातही त्यांनी 10 कि. मी मॅरेथॉन पहिल्या क्रमांकाने जिंकली आहे.
जळगाव मॅरेथॉन विशेष ठरले ते भोयर दांपत्य यांच्यामुळे, नागोराव भोयर यांचे वय 58 तरीही त्यांनी आतापर्यंत वयाच्या दुप्पट मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन चमकदार कामगिरी केली आहे. कित्येक मॅरेथॉनवर त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे.
नागोराव भोयरच फक्त धावतात असं नाही. तर त्यांच्या सोबत त्यांची पत्नी शारदा भोयर याही मॅरेथॉनमध्ये धावतात आणि जिंकतातही.
टीव्ही नाईनशी बोलताना नागोराव भोयर म्हणतात की ही माझी 150 वी मॅरेथॉन आहे, आणि अनेक मॅरेथॉन त्यांनी जिंकलेल्या आहेत.
तर त्यांची पत्नी शारदा याही मॅरेथॉनमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्याही विजेत्या ठरतात. यावेळी त्यांनी सांगितली, मॅरेथॉनमध्ये आम्ही आमचा उदारनिर्वाह चालवतो.
घराच्या खर्चासह त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा खर्चही त्यांनी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेवरच चालवतात असंही त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत त्यांची मुलंही चांगली खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांची मुलंही अशा होणआऱ्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होतात.
नागोराव भोयर सांगतात की आम्ही फक्त मॅरेथॉन स्पर्धाच करतो. त्यासाठी आम्ही पती पत्नीनी दोघांनीही नोकरीसाठी कुठेही अर्ज केला नाही. तर मॅरेथॉनमध्ये मिळालेले बक्षीसावरच त्यांनी आपल्या भोयर कुटुंबीयांचा आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च चालवला असल्याचे सांगितले आहे.