जळगावः शहरात एक अनोखा विवाह समारंभ (Wedding ceremony) पार पडलं आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात अस बोललं जातं. याचाच प्रत्यय जळगावमध्ये आला आहे. या लग्नात वर संदीप सपकाळे (Sandeep Sapkale) हा ३६ इंच उंचीचा तर वधू उज्ज्वला ही ३१ इंच उंचीची (Low-Hight wedding)आहे. या नवदांपत्यासोबत अनेकांना सेल्फी काढण्याचा मोहदेखील आवरता आला नाही. त्यामुळे जळगावात या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली आहे. दोघांचीही उंची कमी असली तरी हा लग्न सोहळा मोठ्या थाठामाठात साजरा झाला. यावेळी अनेकांनी नवदांपत्याला शुभेच्छाही दिल्या.
संदीप हा परिवारात एकुलता आहे. त्याचे आई-वडील हे सर्वसाधारण उंचीचे आहेत. तर उज्ज्वलाला इतर तीन बहिणी व एक भाऊ आहे. हा अनोखा विवाह सोहळा मोठ्या आनंदात पार पडल्याने अनेकांनी संदीप आणि उज्ज्वला यांच्या या विवाह सोहळ्यात उपस्थिती लावली.
आई-वडिलांसह तिचा भाऊ व बहिणी सर्वसाधारण उंचीचे आहेत. त्यामुळे दोघांच्या परिवारात उज्ज्वला व संदीपच्या लग्नाची चिंता होती; मात्र लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात याचा प्रत्यय या लग्नामुळे उघड झाला आहे.
धडधाकड मुला-मुलींचे लग्न जमवतानादेखील अनेक विघ्ने येतात; मात्र संदीप व उज्ज्वला यांची लग्नगाठ अचानक जुळून आली. उज्ज्वलाचे वडील सीताराम कांबळे हे जळगावी आले असता त्यांना या स्थळाविषयी कळले होते; मात्र त्यांना मुलगा काय करतो याबाबत काहीही माहित नव्हते.
संदीप हा शिक्षित आहे, बारावीपर्यंत त्याचं शिक्षण झालं आहे. शहरातील एका नामांकित सुवर्णपेढीत तो कामाला आहे. संदीपच्या लग्नाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्याची उंची ३६ इंच तर उज्ज्वलाची उंची ३१ इंच आहे. अगदी आनंदात हा लग्नसोहळा पार पडला आहे. त्यामुळं दोन्ही परिवार आनंदी आहेत.