मुक्ताईनगर (जळगाव) : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्यांच्या राजकीय (Political) जीवनात माझी मोलाची मदत झाली होती. मात्र याचा त्यांना विसर पडला. दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगी भर के लिये बदनाम किया है, अशी गाण्यातून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यात माझा मोलाचा वाटा आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस मागच्या 5 टेबलच्या नंबरवर बसत होते. मीच माझ्याजवळ घेऊन फडणवीस यांना बसवले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
खडसे पुढे म्हणाले, की विधानसभेत वारंवार देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी मी त्यांना दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यास सर्वांचा नकार होता. मुंडे साहेबांच्या आग्रहास्तव मी त्यांना संमती दिली, तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष झाले. त्यामुळे मी मित्रत्वाचे नाते जोपासले. मात्र त्यानंतर त्यांनी माझ्यामागे एक षड्यंत्र, कुभांड रचले. मुख्यमंत्रीपदावरून मला मागे ठेवण्यात आले. यावरूनच एक गाणे मला एका कार्यक्रमात आठवले. दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगीभर मुझे बदनाम किया, असे टोले त्यांनी यावेळी लगावले.
#Jalgaon : एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ऐकवला हिंदी डायलॉग, म्हणाले…@EknathGKhadse @Dev_Fadnavis #eknathkhadse #devendrafadnavis #Politics
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRywSvh pic.twitter.com/t9cvkMcv6Z— TV9 Marathi (@TV9Marathi) April 14, 2022
मला अभिमान आहे, की मी तरी मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत उत्तर महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणून पोहोचलो होतो. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी षडयंत्र रचले. एकाच पक्षात असूनही माझे फोन टॅप करण्याचा नीचपणा, हलकटपणा फडणवीस यांनी केला, हे अत्यंत घृणास्पद असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी यावेळी महागाई, इंधन दरवाढीवरून सरकारला लक्ष्य केले. गिरीश महाजन यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.