“आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुढे…” ; भाजप-शिवसेनेची धूसफूस राष्ट्रवादीने दाखवली..

| Updated on: Jun 14, 2023 | 5:38 PM

देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व लोकप्रियेतेतून फेल गेल्याचं दाखवण्यात आले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या जी जाहिरात केली गेली आहे. त्या जाहिरातीतून भाजपला पूर्णतः वगळलं असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांचे  नेतृत्व पुढे... ; भाजप-शिवसेनेची धूसफूस राष्ट्रवादीने दाखवली..
Follow us on

मुक्ताईनगर/जळगाव : राज्यात दोन दिवसांपासून शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये सुरू असलेल्या जाहिरात बाजीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडून सडकून टीका करण्यात आला आहे. या जाहिरातीवरून शिवसेना-भाजपमध्ये असलेला बेबनाव कोणत्या पातळीवर गेला आहे. आता आगामी काळातील निवडणुकीवरून हा वाद विकोपाला जाणार असल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसापूर्वी झळकलेल्या जाहिरातीवरून आता विरोधकांसह सत्ताधाऱ्यांमध्येही एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीची चर्चा होऊ लागली आहे.

त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिवसेना आणि भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी या जाहिरातीच्या राजकारणावरून चाललेल्या चर्चेविषयी बोलताना सांगितले की, जाहिरातीवरून शिवसेना-भाजपमधील आता धूसफूस बाहेर आली आहे.

त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून आगामी काळात हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांची काल लोकप्रियता खूपच कमी दाखवण्यात आली आहे.त्यामुळे आता यावरून आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुढे आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत फडणवीस यांच्या नेतृत्वाला दुय्यम स्थान देण्याचे ठरवले असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.

तर देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व लोकप्रियेतेतून फेल गेल्याचं दाखवण्यात आले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या जी जाहिरात केली गेली आहे. त्या जाहिरातीतून भाजपला पूर्णतः वगळलं असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

आज शिवसेनेच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये एकाही भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याचा फोटो नाही. त्यामुळे आजची जाहिरात ही तर तर कालच्या जाहिरातीवरून अंतर्गत धूसफूस चालू असल्याचे सांगत,

यावरून आता अंतर्गत राजकारण वाढली आहे. त्यामुळे आता एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी म्हटले आहे.