वांग्याचं झाड तोडणं पडलं महागात, वयोवृद्ध शेतकऱ्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

| Updated on: Jun 22, 2024 | 5:57 PM

सोशल मीडियावर एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. यामध्ये दिसत आहे की, बैलगाडीमधून एका शेतकऱ्याला त्याचे हात-पाय बांधून नेलं जातंय. मात्र हा प्रकार नक्की काय आहे? जाणून घ्या.

वांग्याचं झाड तोडणं पडलं महागात, वयोवृद्ध शेतकऱ्यासोबत घडला धक्कादायक प्रकार
Follow us on

जळगावमधील यावल तालुक्यातील पाडळसा गावात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 61 वर्षीय वृध्द शेतकऱ्याने शेत बांधा वरील वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातुन शेतकरी पिता- पुत्राने या वृध्दाचे दोराने हात पाय बांधले.त्यानंतर वृद्धाला बैलगाडीमध्ये टाकुन थेट शेतातुन गावातील पिक सोसायटीत आणले. ही घटना गुरूवारी घडली. गावातुन हात पाय बांधुन बैलगाडी टाकुन त्या वृद्धाला नेताना पाहून ग्रामस्थ देखील अचंबित झाले होते. तर शेतकरी पितापुत्राच्या या कृत्याने नागरिकांमधुन संताप व्यक्त केला जात असुन या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाडळसा ता.यावल या गावातील महादेव मंदिराजवळील रहिवासी शेतकरी सुरेश नामदेव कचरे वय 61 यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शेत गट क्रमांक 1237 मध्ये ते कामासाठी गेले होते. दरम्यान काम करत असतांना बांधावरील वांग्याचे झाड त्यांनी उपटून फेकले. तेव्हा वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून शेतकरी रमेश दशरथ बोरसे आणि त्यांचा मुलगा प्रकाश रमेश बोरसे रा. पाडळसा, ता.यावल यांनी वृद्धला मारहाण केली.

दोघांनी दोराने त्यांचे हात-पाय बांधले आणि बैलगाडीत टाकून त्यांना पाडळसा गावातील पीक सोसायटीत आणले. शेतकऱ्यास एकास दोरखंडाने बांधून आणल्याचे वाहुन ग्रामस्थांमधुन संताप व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी वृध्दाच्या तक्रारीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर संशयितांनीदेखील वयोवृद्धा विरोधात तक्रार दिल्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, शेतकरी राजा म्हणून बळीराजा ओळखला जातो. मात्र एखाद्या गुंड मवाल्यासारखं दोघेही वृद्धासोबत वागले. ग्रामस्थांनी हा सर्व प्रकार पाहिल्यावर त्यांनाही धक्का बसला होता. पोलीस या प्करणाचा तपास करत आहेत.