जळगाव : चोपडाकडे जात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना जळगावमध्ये रविवारी सायंकाळी घडली आहे. अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला तर इतर चौघे जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. भैय्या मधुकर बारी असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. तर अनिल बारी, प्रसाद रामदास गुरव , मोना सुनील चौधरी, सुभाष रामलाल भगत अशी चौघा गंभीर जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची धरणगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. (One killed and four injured in car accident in Jalgaon)
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवाशी असलेले पाच तरूण धरणगावकडून चोपडाकडे चालले होते. घटना धरणगाव तालुक्यातील नांदेड व रोटवद दरम्यानच्या चालक भैय्या बारी याचा कारवरील ताबा सुटला. यामुळे कारला अपघात झाला. या अपघातात चालक भैय्या बारी हा जागीच ठार झाला तर अन्य चौघे अनिल बारी, प्रसाद रामदास गुरव , मोना सुनील चौधरी, सुभाष रामलाल भगत हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. तर मयताचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. (One killed and four injured in car accident in Jalgaon)
इतर बातम्या
VIDEO : गो तस्करांनी फिल्मी स्टाईलमध्ये चालत्या वाहनातून गायी फेकल्या, सहा जणांना अटक
Virar Crime : विरारमध्ये लहान मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला नागरिकांकडून चोप