खेमचंद कुमावत, Tv9 मराठी, प्रतिनिधी, जळगाव : वेदांता फॉक्सकॉन नंतर मेडिकल डिव्हाईससुद्धा महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली. 2014 साली पहिल्यांदा भाजपचं सरकार आलं. तेव्हापासून आतापर्यंत बऱ्याच योजना गुजरातमध्ये गेल्या. प्रस्तावित कंपन्या महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेल्यात, अशी टीका भाष्कर जाधव यांनी केली.
देशाचा विचार करता गुजरातचा विकासाला विरोध नाही. परंतु, केंद्र सरकारचा महाराष्ट्रावर काय राग आहे हे कळतं नाही. राज्यात भाजपच्या हातात सरकार येत तेव्हा राज्यातले येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये जातात. वेदांता फॉक्सकॉनचा विषय असेल किंवा ट्वीटचा विषय असाच आहे, असंही जाधव म्हणाले.
भाष्कर जाधव म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन तिकडं गेल्यानंतर विद्यमान सरकार म्हणते यापेक्षा मोठा प्रकल्प आपल्याला मिळणार आहे. मोठा देणार आहात तो तु्म्ही गुजरातला घ्या. 90 टक्के वेदांता राज्यात येण्याचं नक्की झालंय.
तो उद्योग तिकडं नेताय. आहे ते देण्याची दानत तुमची नाही. त्यामुळं महाराष्ट्राला फार काही मोठं द्याल. दुसऱ्या येणार तेव्हा द्याल. याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा काही विश्वास नाही.
वेदांता संदर्भात आदित्य ठाकरे खोटं सांगत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. जो करार राज्यसरकारसोबत झालंय, त्याची कॉपी दाखवावी अन्यथा लोकांची माफी मागावी. त्यावर भाष्कर जाधव म्हणाले. रामदास कदम वेदांता पापकॉन पापकॉन बोलतात.
यांना वेदांता फॉक्सकॉन म्हणता येत नाही. प्रकल्पाचं नाव घेता येत नाही. रामदास कदमांची बुद्धिमत्ता काय. रामदास कदम यांच्याकडं लोक जोकर म्हणून पाहतात, अशी टीकाही भाष्कर जाधव यांनी केली.