जळगावः राष्ट्रवादी आमदार आणि त्यापूर्वी भाजपमध्ये असलेले एकनाथ खडसे यांना ज्या ज्यावेळी भाजपवर टीका करण्याची संधी मिळते त्यावेळी ते भाजपवर जोरदार हल्लाबोल करत असतात. आताही जळगावच्या राजकारणाविषयी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या राजकारणावरुन आता जिल्ह्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यामुळे एकमेकांवर प्रचंड आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
त्यामुळेच त्यांनी जळगाव राजकारणाविषयी बोलताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील संस्था विरोधकांनी म्हणजेच भाजपनी डबघाईला आणायच्या आणि नाथाभाऊनी त्या नीटनेटक्या करायच्या हे आतापर्यंतचं उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्हा दूध संघाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापले आहे. त्यातून राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर भाजप नेत्यांनी आरोप प्रत्यारोपही केले आहेत. दुध संघात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आला होता.
त्यामुळेच जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जळगाव दूध संघ केंद्रस्थानी आला होता. आताही त्याच्यावरुनच राजकारण तापले असल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
एकनाथ खडसे यांच्यावर जिल्हा दूध संघावरुन टीका केली जात असली तरी त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात यांनी संस्था डबघाईला आणायच्या आणि नाथाभाऊने त्या नीटनेटक्या करायच्या हे आतापर्यंतचं उदाहरण आहे.
त्यामुळे हे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे आहेत, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.
जिल्ह्यातील दूध संघाच्या राजकारणातून एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात येणारी टीकी ही व्यक्तिगत द्वेषातून केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याविषयी बोलतानात ते म्हणाले की, माझ्या नावाला व्यक्तिगत द्वेषातून विरोध होतो असल्याचे सांगून त्यांनी मंगेश चव्हाण यांनाही टोला लगावला आहे.