दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना धक्का, निकालानंतर खडसे यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Dec 11, 2022 | 5:47 PM

त्यांच्या अहंकाराचा पराभव झाला, असं चिमणराव पाटील यांनी सांगितलं.

दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना धक्का, निकालानंतर खडसे यांची पहिली प्रतिक्रिया
KHADSE NEW
Follow us on

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना धक्का बसला. एकनाथ शिंदे यांच्या सहकार पॅनलचा पराभव झालाय. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण, चिमणराव पाटील हे विजयी झालेत. या निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसे म्हणाले, पारदर्शकपणे काम केलं. पण, काही गोष्टींमध्ये आम्ही कमी पडलो. त्यात महत्त्वाचं म्हणजे खोके, खोक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. त्यात आम्ही कमी पडलो असल्याचं खडसे म्हणाले.

या निकालानंतर गुलाबराव पाटील म्हणाले, खोक्यात कमी पडलो, असं खडसे यांचं म्हणणं योग्य नव्हे. कारण त्यांचे चार-पाच प्रतिनिधी निवडून आले. याचा अर्थ त्यांनीही खोके वाटले का, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. लोकांनी कामावर पसंती दिली. चोखंद्या लोकांच्या मतांची ही निवडणूक होती. भाजप नेते गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनलने घवघवीत यश मिळवलं. दूध संघात मिळवलेल्या यशानंतर महाजन समर्थकांनी एकच जल्लोष केला. गिरीश महाजन यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्ते नाचले. गिरीश महाजन यांच्यासोबत भाजपा आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या वडिलांना देखील कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला.

शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांची खडसेंवर जहरी टीका केली. दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर आमदार चिमणराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना खडसेंना लक्ष केलंय. हे यश आम्हाला अपेक्षित होतं. अपेक्षेप्रमाणे सुंदर असं यश मिळालंय. जनतेने अगदी उत्तम प्रकारे आम्हाला कौल दिलाय.

या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. लोकशाहीमध्ये सर्व लोक मिळून यश मिळतं. मी-मी करून चालत नाही. मतदारांनी खडसे यांचा हाच अहंकार डुबवून नेला. त्यांच्या अहंकाराचा पराभव झाला, असं चिमणराव पाटील यांनी सांगितलं.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसेंना पराभव झाल्याने तसेच मंदाकिनी खडसे हरल्याने मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार यांनी समर्थकांसह जल्लोष केला. शहरात फटाक्याची आतजबाजी करत ढोल ताशाचा गजर केला.