जळगावः पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच सत्यजित तांबे यांची भाजपशी जवळीक वाढल्याने त्यांच्यावर काँग्रेसच्या हायकमांडकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता सत्यजित पाटील यांच्याबाबत काँग्रेस आणि भाजप काय निर्णय घेतील ते गुलदस्त्यात असलं तरी ठाकरे गटाकडून ज्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले.
त्यांनी आता सत्यजित तांबे यांच्यावर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तांबे विरुद्ध पाटील असा सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवार शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना थेट आव्हान देत आमचे कार्यकर्ते 2 तारखेची वाट बघत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या विजयाची खात्रीही दिली आहे.
त्यामुळे शुभांगी पाटील आणि तांबे यांच्यामधील लढत नेमकी कशी होणार याकडे आता सगळ्या राजकीय पक्षासह भाजप आणि काँग्रेसचंही लक्ष लागून राहिले आहे.
शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना थेट आव्हान देत त्यांनी जो खुर्चीसाठी खेळी करू शकतो, त्यांच्याकडे बघण्यात काही अर्थ नाही.
आणि जो एकनिष्ठ राहू शकत नाही. त्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही असा खोचक टोला लगावत सत्यजित तांबे यांच्या काँग्रेस पक्षाबरोबरच्या एकनिष्ठतेबद्दलही शुभांगी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
शुभांगी पाटील यांनी तांबे यांच्यावर टीका करताना आपल्या मतदार संघातील मतदारांवर त्यांनी विश्वास व्यक्त करत ही जनता एवढी दुधखुळी नाही.
आणि या जनतेवर माझा विश्वास आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सत्यजित तांबे यांच्यावर धनशक्तीचा ठपका ठेवत येथील जनता कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही असंही त्यांनी म्हटले आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाकडून पाठिंबा जाहीर केला गेला आहे. त्यामुळे शुभांगी पाटील यांनी या निवडणुकीत आपणच निवडून येणार असल्याचे सांगत महाविकास आघाडीतील घटक पक्षावरही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.