‘माझी गाडी पोलीसांना अडवायला सांगून त्यात अंमलीपदार्थ…,’ काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन

| Updated on: Jul 24, 2024 | 9:08 PM

संपूर्ण राज्यांमध्ये विविध नेत्यांवर विधानसभेची जबाबदारी वाटण्यात आली आहे आणि येत्या काळात जिल्ह्यांमध्ये बैठका होणार आहेत. समन्वय साधला जाणार आहे असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

माझी गाडी पोलीसांना अडवायला सांगून त्यात अंमलीपदार्थ..., काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन
girish mahajan and anil deshmukh
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव ( Shyam Manav ) यांनी आरोप केले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणात अडकविण्याच्या फाईलवर सही करण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला आहे. यावर अनिल देशमुख 100 कोटीच्या वसुली प्रकरणातील जामीनावरील आरोपी आहेत. श्याम मानव यांनी सुपारीबाजांच्या नादाला लागून खोटे आरोप करु नये असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावर श्याम मानव यांचे आरोप कपोलकल्पित आहेत असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. देशमुख यांनी आपल्याला अडकविण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्यावर दबाव टाकला होता. विशेष सरकारी वकीलांच्या यासंबंधीचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही आमच्या ताब्यात असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.अशातच आता अनिल देशमुख यांच्याबाबत भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. माझ्यावर तीन वर्ष बारा महिन्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील येथे निंभोरा येथील गुन्ह्याची नोंद व्हावी यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांच्यावर दबाव आणला होता. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक मुंडे यांनी माझ्या ही बाब लक्षात आणून दिली होती.याबाबत मी स्वत:अनिल देशमुख यांच्याशी सुद्धा बोललो होतो.त्यावेळी त्यांना आपण सांगितले होते की असा कसा तुम्ही गुन्हा दाखल करू शकता ? असा जाबही विचारला होता असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

माझ्यावर मोक्का लावण्यासाठी हा गुन्हा दाखल करायचा होता.म्हणून म्हणून खोट्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे संभाषण रेकॉर्ड झालेले आहे.अनिल देशमुख यांनी कशा पद्धतीने पोलीस अधीक्षकांना धमकी देऊन हा गुन्हा दाखल करायला लावला, याचा उल्लेख विशेष सरकार वकील प्रवीण चव्हाण यांच्या संभाषणात आलेला आहे. यासंदर्भात सीबीआयने देखील चौकशी केलेली आहे. अनिल देशमुख यांनी कसा खोटा गुन्हा दाखल करायला लावला.याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे.मला अडकवण्यासाठी यांनी प्लॅनिंग केले होते. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे.त्यासाठी कोणा साक्षीदाराची गरज नाही.

मला अडकवण्यासाठी काय काय नाही केलं यांनी. माझी गाडी पोलिसांना अडवायला सांगून त्यात अंमलीपदार्थ टाकून द्या असा देखील दबाव टाकण्यात आला होता.पोलिस अधीक्षक मुंडे यांना फोन करून खोटे गुन्हे दाखल करायला भाग पाडले होते. याला दबाव तंत्र म्हणतात. गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचा उजवा आता आहेत. भाजपचे संकटमोचक आहेत..त्यामुळे त्यांना संपवा असे सुद्धा त्यांनी वारंवार म्हटलं होते.हे संपले म्हणजे भाजपा आपोआप संपते. प्रवीण चव्हाण आणि नेमलेल्या पोलीस अधिकारी यांच्यात झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

अजितदादा निधी देताना नाराज होते ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते अर्थमंत्री असल्यामुळे त्यांना संपूर्ण राज्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे अजितदादा यांचं म्हणणं होतं की तुमच्या काही योजना असतील किंवा काम असतील त्यात थोडी कपात करा. मात्र त्यांचं म्हणणे ही योग्य आहे आणि आमचाही आग्रह योग्य आहे.ग्रामीण भागातच रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यासाठी मी त्यांच्याकडे निधीची मागणी केली होती. मात्र यावरून कुठलेही वाद झालेले नाही. जमीन विकून निधी देऊ का असे अजित पवार बोलल्याची बातमी खोटी आहे. हे सर्व असत्य असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

अजितदादा पवार अमित शहा यांची भेट ?

याबाबतीत मला कुठलीही माहिती नाही ही माहिती मला तुमच्याकडूनच मिळाली आहे.याबाबतीत आपल्याला काहीही माहिती नसल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. अजित पवार गटात आमदारात चलबिचल चालू आहेत असे काही आहे असं मला वाटत नाही. तिन्ही पक्ष मिळून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.आमच्यामध्ये एकमत आहे.कोणी आमदार काही म्हणत असेल तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.