जळगावः जळगाव – भुसावळ (Bhusawal) रेल्वे स्थानकावरून सकाळी 11 वाजता निघालेल्या अहमदाबाद – बरौनी एक्स्प्रेस रेल्वेच्या (Railway) एसी डब्यातून धूर निघाल्याने एकच खळबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखून ही गाडी तात्काळ उभी केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अहमदाबाद – बरौनी एक्स्प्रेसच्या (Express) एसी डब्यातून भुसावळ आणि जळगावच्या दरम्यान धूर निघाल्याचे दिसून आले. S-7 बोगीचे सेंटर ओपन असल्याने हा धूर निघाल्याचे समजते. त्यामुळे एक्स्प्रेसच्या गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान ओळखून ही गाडी तात्काळ गाडी जळगावातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी केली. घटनास्थळी महापालिकेचे तीन अग्निशमन बंब दाखल झाले. मात्र, तत्पू्र्वीच रेल्वेच्या टेक्निशियन यांनी सेंटर ओपन करून वाढणारी आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे जळगाव रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती. काही वेळात आग आटोक्यात आल्याने धूर निघणे बंद झाले. त्यानंतर ळगावकडून अहमदाबादकडे ही रेल्वे मार्गस्थ करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड, लासलगाव, निफाड व नाशिक येथील चाकरमानी व प्रवाशांची लाइफलाइन म्हणून ओळख असलेली मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस रेल्वे दोन वर्षांच्या कालखंडानंतर अखेर आजपासून सुरू झाली. लासलगाव रेल्वे स्थानकात गोदावरी एक्स्प्रेस येताच तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रवासी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय, तर प्रवाशांसह चाकरमान्यांचे होत असलेले हाल याची दखल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतली. त्यांनी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर गोदावरी एक्स्प्रेस मनमाड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत सुरू करण्यात आली आहे.
नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होणार म्हणून चर्चेत असणारी नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवा कधी सुरू होणार, अशी विचारणा आता नागरिकांमधून होत आहे. या रेल्वे सेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे.