Special Report : लता सोनावणे यांची आमदारकी रद्द होणार? निवडणूक आयोग शिंदे गटाला धक्का देणार?

| Updated on: Dec 18, 2022 | 10:59 PM

शिंदे यांच्याकडं सध्या ५० आमदार आहेत. त्यांच्यासाठी एक-एक आमदार महत्त्वाचा आहे.

Special Report : लता सोनावणे यांची आमदारकी रद्द होणार? निवडणूक आयोग शिंदे गटाला धक्का देणार?
Follow us on

जळगाव : शिंदे गटाच्या आमदार लता सोनावणे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. कारण सोनावणे यांच्या जातप्रमाणपत्राची राष्ट्रीय न्यायाधिकरण समितीकडून चौकशी सुरू आहे.  निवडणूक आयोग शिंदे गटाला धक्का देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं झाल्यास लता सोनावणे यांची आमदारकी रद्द होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनावणे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे.

सोनावणे यांच्या जातप्रमाणपत्राची राष्ट्रीय न्यायाधिकरण समितीनं चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी समिती लवकरचं निर्णय़ देण्याची शक्यता आहे. त्यामुळं लता सोनावणे यांना विधानसभेतून अपात्र ठरविलं जाऊ शकतं.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनीही लता सोनावणे यांना अपात्र ठरवता येईल का अशी विचारणा राष्ट्रीय एसटी आयोगाकडं केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं सोनावणे यांचं जातप्रमाणपत्र बनावट असल्याचं म्हटल्यावरही अपात्रतेची कारवाई झाली नाही. त्यामुळ चंद्रकांत बरेला यांनी नॅशनल कमिशन फॉर एसटीमध्ये याचिका दाखल केली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लता सोनावणे या चोपडा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडूण आल्या. या निवडणुकीत त्यांना ७८ हजार १३७ मतं मिळाली. त्यांनी जगदीशचंद्र वळवी व चंद्रकांत बरेला यांना पराभूत केलं. शिवसेनेत बंड झाल्यानंतर लता सोनावणे शिंदे गटात गेल्या.

शिंदे यांच्याकडं सध्या ५० आमदार आहेत. त्यांच्यासाठी एक-एक आमदार महत्त्वाचा आहे. त्यामुळं लता सोनावणे यांची आमदारकी रद्द झाली तर तो शिंदे गटासाठी मोठा धक्का असणार आहे.