काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाली की नाही; नाना पटोलेंनी उघडपणे सांगितलं

| Updated on: Jan 02, 2024 | 3:04 PM

Nana Patole on Prakash Ambedkar and Vanchit Bahujan Aghadi : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. अशात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार का? याची सध्या चर्चा होतेय. यावर नाना पटोलेंची रोखठोक प्रतिक्रिया

काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाली की नाही; नाना पटोलेंनी उघडपणे सांगितलं
Follow us on

किशोर पाटील, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, जळगाव | 02 जानेवारी 2024 : देशात या वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या काहीच महिन्यांवर ठेपली आहे. अशातच इंडिया आघाडीने आपली तयारी सुरु केली आहे. राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांमध्ये भेटी होतायेत. जागवाटपावर चर्चा होत आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. जळगावमध्ये बोलताना नाना पटोले यांनी वंचितसोबतच्या आघाडीवर स्पष्ट भाष्य केलं आहे.

पटोले काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर यांचं शरद पवार यांच्याशी बोलणं झालं आहे आमच्याशी आंबेडकरांचं अद्याप बोलणं झालेलं नाही. दिल्लीत बैठक घेण्याबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे या सर्व विषयावर चर्चा दिल्लीत केली जाईलस असं पटोले म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये जागांचं समसमान वाटप व्हावं. असा फार्म्युला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. यावर काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

पटोलेंची सरकारवर टीका

सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या चर्चेवर नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस असतील हे सरळ सरळ खोटे बोलत आहेत. यांना राज्य बकाल करायचं, राज्याला उध्वस्त करायचं. हा फॉर्मुला आताच या सरकारचा दिसत आहे. महाराष्ट्राला बरबादीकडे घेऊन जाण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, हे यावरून स्पष्ट झालं आहे. प्रकल्प बाबत अजित पवार यांच्या हातात काय आहे? मात्र बोलावं लागतं म्हणून ते बोलतात, असं नाना पटोले म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पटोले म्हणाले…

सरकारला मराठा आरक्षण द्यायचं नाही मराठा आणि ओबीसी मध्ये होणारा वाद हा कायम पेटवत ठेवायचा आहे. जनतेचे मूळ मुद्दे आहेत ते डायव्हर्ट करण्यासाठी सरकार अशा पद्धतीने काम करत आहे. विधानसभेमध्ये आम्ही सरकारला बोलतं केलं आहे. मात्र सरकारने गोल गोल उत्तरं देत फिरवलं. सरकारला हा वाद पेटवून ठेवायचा आहे. हेच यातून स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.