जालना : जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे. हा तरुण भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याची माहिती आहे. (Jalna BJP volunteer beaten up by police for ruckus in Hospital)
नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड
हा व्हिडीओ 9 एप्रिलचा आहे. दर्शन देवावले या तरुणाचा अपघात झाला होता. त्याला जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारा दरम्यान दर्शन देवावले याचा मृत्यू झाला. दर्शनच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी दीपक हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डची तोडफोड केली होती.
पोलिसांची तरुणाला बेदम मारहाण
यानंतर जालना पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिराडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे पोलीस पथक घटनास्थळी आले. त्यावेळी तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. कारण काहीही असलं तरी अशा अमानुष मारहाणीचं समर्थन होऊ शकत नाही.
भाजप आमदाराकडून कारवाईची मागणी
दरम्यान, जालना शहरातील भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाला याच्यावर अमानुष हल्ला करणाऱ्या मुजोर पोलिसांचे निलंबन होत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही, संबंधित पोलिसांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी ट्विटरवरुन केली आहे.
जालना शहरातील भाजपा कार्यकर्ता शिवराज नारियलवाला याच्यावर अमानुष हल्ला करणाऱ्या मुजोर पोलिसांचे निलंबन होत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही .
तात्काळ निलंबन करा . @DGPMaharashtra @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @hmo_maharashtra pic.twitter.com/Ajme9I5LtD— Ram Satpute (@RamVSatpute) May 27, 2021
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
VIDEO | आधी कोयत्याच्या धाकाने बेदम मारहाण, नंतर तरुणाला गाडीवर बसवून चौघे पसार
(Jalna BJP volunteer beaten up by police for ruckus in Hospital)