उद्धव ठाकरे सत्तेसाठी ते अशा लोकांसोबत बसले आहेत. पाकिस्तानचा अजेंडा काँग्रेस पक्ष पुढे नेत आहे. भविष्यात जर काँग्रेस सत्तेत आली तर हे राम मंदिराला कुलूप लावतील. इंडिया आघाडी जिंकली तर त्यांचा पंतप्रधान कोण असेल. त्यांना विचारलं तर ते एकेक वर्ष भागिदारीत बनणार अस म्हणतात. मोदीजींकडे दहा वर्षांच्या कामाचा हिशोब आहे आणि पुढच्या पंचविस वर्षाचा अजेंडाही आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवनं म्हणजे पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं आहे. इंडिया आघाडीकडे कोणताही प्रोग्रॅम नाहीये, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस पक्षावर घणाघात केला आहे.
रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा निवडून द्या ते खुप मोठे माणूस बनणार आहे. जालन्याला टॉपवर आणण्याचं काम करू. जिल्ह्यातल्या देवेस्थानाला प्रणाम… सरदार पटेल आणि स्वामी रामानंद तिर्थ यांना प्रणाम करतो, कारण निजामातून त्यांनी मुक्त केलं होतं. जालन्याची जनतेनं ठरवायचं हा देशा कुणाच्या हातात द्यायचा, असंही अमित शाह म्हणाले.
इंडिया आघाडीनं बारा लाख करोडचा घोटाळा केला. हा वर्षात बारा लाख करोड चा भ्रष्टाचार करणारी इंडिया आघाडी राहुल गांधींच्या नेतृत्वात आहे. आमच्या वर कुणी 25 पैशांचाही आरोप कुणी करू शकत नाही. गर्मीच्या दिवसात बॅकाॅक आणि थायलंडच्या सुट्टीवर जाणारे राहुल गांधी आहे. एकही दिवस सुट्टी न घेतलेले मोदी आहेत मग तुम्ही ठरवा कुणाला निवडून द्यायचं. मोदींनी या देशाला समृद्ध केलं जगात देशाचा सन्मान वाढवला. या काँग्रेसवाल्यांनी वर्षानुवर्ष राम मंदिराचं काम थांबवून ठेवलं. मात्र मोदीजींनी करून दाखवलं, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
जालन्याचे बच्चा बच्चा काश्मीरसाठी जीव देवू शकतो. इंडिया आघाडीवाले 370 कमल सांभाळून बसले होते. मात्र मोदींनी ती हटवली. मोदींनी आतंकवाद आणि नक्षलवाद संपवून टाकला. इंदिरा गांधी म्हणून गेली गरिबी हटाव मात्र एकाही काँग्रेसवाल्यानं ते केलं नाही. मात्र 80 करोड गरिबांच्या घरी मोदीजींनी राशन पाठवलं. मोदीजीनी 130 करोड नागरिकांना लसीकरण करून सुरक्षित केलं, असंही अमित शाह म्हणाले.