मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. घनसावंगी मतदारसंघात गोरी गंधारी गावात मनोज जरांगे यांनी मतदान केलं. प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपल्या हक्काचा माणूस बजावला पाहिजे. यावेळी मतदानाचा उठाव करावा लागेल असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. आपला अधिकार आहे. योग्य माणूस निवडण्याची हीच संधी असते. सर्व जनतेने मतदान केलं पाहिजे. मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचं आहे. आपल्या लेकराच्या बाजूने जो असेल त्याच्या बाजूने 100% मतदान करावं. मतदान करताना आपल्या लेकाला आणि लेकीला विचारून मतदान करावं. आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्याला सोडू नका. आपल मत विजयाच्या बाजूने पडलं पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
कोणी माझ्या बाजूला फोटो काढला याचा अर्थ मी कोणाला पाठिंबा दिला असं नाही. हे समजणं समजून घ्यावं. समाजाने म्हणून जे करायचं ते करावं. कोणी संभ्रम निर्माण करेल मी कुठेही टीम पाठवली नाही. कुठेही मेसेज पाठवला नाही. मराठा समाजाने संभ्रम करून घेऊ नका तुम्हीच मालक आहात. आपला कोणालाही पाठिंबा नाही. मराठा समाजाने योग्य निर्णय घ्यावा, असं जरांगे यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हिंदुत्व तोडणारा राक्षस, अशा शब्दात स्वयंघोषित कालीचरण महाराज यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेलाही मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तो 100% राजकीय दलाल आहे. परत बोलला याचा अर्थ तो राजकीय नेत्यांची पाय चाटतो. त्याला हिंदू धर्माची काही घेणं देणं नाही. याला मराठ्यांचा प्रचंड तिरस्कार आहे. आहे. वढ्या – खोड्याला जन्मलेली पैदास आहे ही…, अशा शब्दात मनोज जरांगेंनी टीका केली आहे.
मी मैदानात नाही. जनतेच्या हातात आहे. सगळं जनतेने अन्याय आणि अत्याचार विसरू नये. अंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. अंतरवाली सराटीत राज्यातील मराठा बांधव सामूहिक उपोषण करणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषणाची तारीख ठरवू, सरकार कोणतही येऊ द्या, असं जरांगे यावेळी म्हणाले.