जालनाः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार हल्ला प्रतिहल्ला करत आहेत. त्यातच पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचाराप्रसंगी बोलताना सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीवर सडकून टीकी केली जात आहे. तर तेवढ्याच ताकदीने विरोधकांकडून पलटवार केला जात आहे.
जालना येथे भाजप आमदार बबनराव लोणीकर बोलत असताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपचे 200 आमदार निवडून आणण्यासाठी चंद्रकांत बावनकुळे महाराष्ट्रभर फिरत आहेत असल्याचे सांगत त्यांनी राज्यात आणि देशात फक्त भाजपची सत्ता आणायची आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ते पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदापर्यंत एक हाती सत्ता भाजपची आणायची आहे. त्यामुळे सर्वस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे असं मतही त्यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीवर टीका करताना आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे की, अगोदरचे सरकार म्हणजे आंधळं दळते आणि कुत्रे पीठ खाते तशी अवस्था होती.
तर त्याच वेळी त्याआधीच्या भाजपचे सरकार असताना आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे असताना त्यांनी राज्यात विजेचे जाळे निर्माण केले तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर अलीबाबा चाळीस चोरांचे सरकार आले आणि वॉटर ग्रीड योजना बंद केली असा जोरदा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
परभणी लोकसभा निवडणूक भाजपला जिंकायची आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री घराबाहेर निघाले नसल्याचे सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आमदार बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडीच्या सरकारव सडकून टीका केली. यावेळी त्यांनी आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते अशी अवस्था महाविकास आघाडीच्या सरकारची होती. त्यामुळे राज्यात ते सरकार आल्यानंतर वाईट दिवस आले असल्याची जहरी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.