मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. आता मराठ्यांच्या बाबतीत सरकारचे डोळे गेले आहेत. आता ओबीसी नेते कुठे झोपले आहेत. येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला आहे? आता या जातींना विरोध का नाही?, अशा शब्दात मनोज जरांगेंनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मराठे आता शहाणे होतील. मराठ्यांचे डोळे उघडणे गरजेचं होतं. सरकारने या जातींना ओबीसीत घेताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं आहे का? हे एकमेकांना लिफ्ट देत आहेत. मराठ्यांना आरक्षण देताना यांना त्रास होतो. एवढा जातीयवाद कशासाठी?, असंही मनोज जरांगे म्हणालेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मनोज जरांगेंनी टीका केली आहे. त्याला काय कळत हेंद्रा आहे तो…. त्याने मराठ्यांचा खेळ संपवला आहे. काय नेरेटिव्ह त्याने सेट केला? आमच्या लोकांना पंधराशे रुपये देतो आणि त्यांना आयुष्यभराच आरक्षण देणार हे योग्य नाही. अशाच आमच्या समस्या असल्यानंतर आम्ही सण उत्सव कसे साजरे करणार? फडणवीस यांनी मराठ्यांवर काही उपकार केले आहेत का? उघड्या डोळ्यांनी तुम्ही मराठ्यांचा घात केला. जातवान मराठे तुमचा भुगा करणार अशा शब्दात मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील 15 जातींची ओबीसींच्या यादीत समावेश झाला आहे. 5 जातीच्या नागरिकांची लोकसंख्या ही तब्बल 10 लाख इतकी आहे. यावर मनोज जरांगेंनी भाष्य केलं. आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. हे भाजपचे पांचट मोचक आहेत. यांनीच या जाती ओबीसीत घेतल्या आहेत. ओबीसीत घेतलेल्या जाती गिरीश महाजन यांच्या जातीच्या उपजाती आहेत, असं म्हणत मनोज जरांगेंनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.
सगळीकडे मराठ्यांचं मतदान आहे. प्रत्येक मतदार संघात एकेक लाख मतदान आहे. यांना आधी हिंदुत्व म्हणण्याची सवय आहे. आता हिंदू संघटनांसमोर पेच आहे की हे आहे कुणाचे? हरियाणा आणि महाराष्ट्राचं गणित जुळणार नाही. आचारसंहिता लागण्याआधी मराठ्यांनाआरक्षण द्या. तुम्ही फक्त आचारसंहिता लावा मग तुम्हाला कचका दाखवतो.तुमचे सगळे पाडतो. इथे नेता कार्यकर्ता समाज संपत नाही. तुमचे सगळे पाडतो, असं म्हणत जरांगेंनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं आहे.