टीका करणाऱ्या कालिचरण महाराजांची जरांगे पाटलांनी अक्कल काढली; म्हणाले, माझ्या आई-बहिणींवर…

| Updated on: Nov 19, 2024 | 1:15 PM

Manoj Jarange Patil on Kalicharan Maharaj Statement : मनोज जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराज यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटलांनी कालीचरण महाराजांची अक्कल काढली आहे. जरांगे पाटील यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...

टीका करणाऱ्या कालिचरण महाराजांची जरांगे पाटलांनी अक्कल काढली; म्हणाले, माझ्या आई-बहिणींवर...
मनोज जरांगे पाटील, कालिचरण महाराज
Image Credit source: Facebook
Follow us on

स्वयंघोषित कालिचरण महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एक विधान केलं. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणजे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस, अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी टीका केली. मनोज जरांगेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बाबाला काही गरज नव्हती. आरक्षण आणि बाबांचा काय संबंध येतो. या बाबाने बरच सांगितलं. बाबांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे, हे त्यांचं काम आहे. आरक्षण काय हे शिकवण त्यांचं काम नाही. हा विचित्र प्राणी आहे. तू का बाबा आहे का हेंद्र्या? माझ्या आई बहिणीवर हल्ला झाला होता तेव्हा तू कुठे गेला होता? हा टिकल्या, गंध लावतो…नथ घालतो, असं म्हणत मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जरांगेंची कालिचरण महाराजांवर टीका

हिंदू धर्मावर ज्यावेळी संकट येतं. तेव्हा आम्ही समोर येतो. तुला मी कधी बोललो नाही. तू वर आणि खाली वेगळा दिसतो. तुला कधी मी बोललो नाही. बाबा तुला आमचं दुःख कळायचं नाही. तुम्ही पाकिटं घेऊन किर्तनं करता, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. गरिबांच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतं ते विचार, हिंदूत अर्धा एकटा मराठा आहे. तू सुपारी घेतली असेल, असं म्हणत मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे.

आम्ही छत्रपतीच हिंदुत्व चालवतो तू कोणतं हिंदुत्व चालवतो. तू आतून काही घालतो की नाही हे लोकांना माहीत नाही. तुला काय अक्कल आहे का रे? कालीचरण हा सपाट दिसतो वरून खालपर्यंत… सरकारने हे असले संत कुठून प्रचाराला आणलेत. हिंदू असूनही का मराठ्यांच्या पोराला मारायला निघालेत? तुला मराठ्यांचा तिरस्कार का आहे? पक्षाला बदनाम करण्यासाठी तू आम्हाला बदनाम करतो का?, असं म्हणत मनोज जरांगे यांनी कालीचरण महाराजांची नक्कल केली आहे.

कालिचरण महाराज यांचं विधान

आता एक आंदोलन सुरु झालं होतं ते तुम्हाला माहिती आहे का, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडायचं. अशी हवा होती त्या आंदोलनाची… अशी हवा… लाखो लोकं मुंबईत. टेन्शन काय होतं माहिती आहे? एवढे लोकं जेवतील कुठे आणि टॉयलेटला जातील कुठे? मला टेन्शन आलं की, त्यांनी आता जावं कुठे? कुठला त्यांचा नेता थडग्यावर चादर चढवेल. आला रे चादरवाला आला रे आला. हे जाती-जातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाहीत तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस आहेत. राक्षस… , असं म्हणत कालिचरण महाराज यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती.