अंतरावली सराटी, जालना | 21 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षण विधेयक काल विधानसभेत आणि विधानपरिषदेत संमत झालं. या विधेयकानुसार मराठा समाजाला राज्य सरकारी नोकरीमध्ये आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण दिलं जाणार आहे. मात्र या सगळ्याला मनोज जरांगे पाटील यांचा विरोध आहे. आज जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जाणून बुजून आणि मुद्दामून सरकार ही उपोषणाची वेळ आणत आहे. काल त्यांनी विषय घ्यायला पाहिजे होता. सामजाची दिशा, म्हणणं ओबीसी आरक्षणाची आहे. त्यांनी जर पालकत्व स्वीकारलं असेल तर त्यांना पश्र्चाताप झाला असावा. 12-1 वाजेपर्यंत दिशा फायनल होईल, असं मनोज जरांगे म्हणाले.
राजकारण डोळ्यासमोर ठेवून ही खेळी केली आहे. ते त्यांना लय गरजेचे आहेत. हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं असेल. शहाणे असतील तर त्यांनी कालच्या मॅटरवरून लक्षात घ्यावं. त्यांनी मनाने म्हणलं पाहिजे. लोकांचं विश्वास आहे. विश्वास घात होईल असं वागू नये. आम्ही वाशीत सांगितलं होतं की, गुलालाचा अपमान करू नका. त्यांनी स्वतः सांगावं कोण आरक्षण देऊ देत नाहीयेत किंवा सांगावं की मीच देत नाहीये, असंही जरांगे पाटील म्हणाले.
ते टिकेल की नाही त्यात आम्हाला पडायचं नाहीच आहे. आम्हाला जे पाहिजे ते द्या ना. आधीच्या नियुक्त्या दिल्या तर बरं होईल. 350-400 लोक आहेत ज्यांच्यावर हल्ला झाला होता. हैद्राबाद गॅझेट घेणं म्हणजे काय परदेशातील काम नाहीये. लय मोठा विषय नाहीये. तुम्ही लोकांना सांगण्यासारख केलं तरी काय? कालच्या अधिवेशनात जनतेचा फायदा व्हायला पाहिजे होता. तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं, असं मनोज जरांगे म्हणाले.
तुम्ही दोन्ही दिलं असतं ना तर, 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. त्यांना परत 106 सारखे निवडून आणायचे आहेत म्हणून असं करत आहेत. येवढं मोठा मुद्दा असताना निवडणुका घेऊच शकत नाहीत ते, असं म्हणत मनोज जरांगे यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं.