संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जालना | 29 ऑक्टोबर 2023 : राज्यातील अवघा मराठा समाज मराठा आरक्षणाकडे डोळे लावून बसलेला आहे. ठिकठिकाणी मोर्चे आंदोलनं होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसांची मुदत देऊनही सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीव्ही 9 मराठीवर मुलाखत प्रसिद्ध झाली. यात फडणवीसांनी सरकार जरांगे यांच्या चर्चा करायला तयार असल्याचं म्हटलं. यावरूनच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सवाल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या कानात बोळे घातलेत काय? या म्हटलं ना, चर्चेला… फक्त एकदाच चर्चेला या. मला बोलता येते का बघा. आजच्या आज या. त्यानंतर मला मला बोलता येणार नाही. माझी परिस्थिती आहे. फक्त एकदाच या. आरक्षण द्यायचं की नाही सांगा. बाकीची वळवळ करू नका, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीव्ही 9 मराठीवर मुलाखत झाली. यात त्यांनी जरांगे यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. मी जरांगेंना काही सांगणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतली आहे. ते कमिटेड आहे. मी स्वत सांगतो, मुख्यमंत्र्यांची शपथ पूर्ण होण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार. सरकार गांभीर्याने काम करत आहे. त्यांनीही सरकारसोबत चर्चा केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, लोकशाहीने आयुध दिलं. त्यात उपोषण आहे. आम्ही गांभीर्याने घेतलं. चर्चाच झाली नाही तर कसं होईल. चार आयडिया आमच्या असतील. चार आयडिया त्यांच्या असतील. यावर चर्चा व्हावी. पण चर्चा काही माधमांच्या कॅमेरा समोर होत नसते. हे पण त्यांनी लक्षात घ्यावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मुलाखतीत म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांच्या या आवाहनाला मनोज जरांगे पाटील यांनी आता उत्तर दिलं आहे.