मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेची माघार

| Updated on: Nov 04, 2024 | 11:04 AM

Manoj Jarange Patil on Vidhansabha Election 2024 : आताच्या घडीची मोठी बातमी... विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेंनी माघार घेतली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली आहे. का घेतली निवडणुकीतून माघार? मनोज जरांगेंनी कारण सांगितलं आहे. वाचा सविस्तर...

मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेची माघार
MANOJ JARANGE PATIL
Follow us on

राज्यातील विधानसभा निवडणुकीतील आताच्या घडीची मोठी बातमी आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. 288 जागांवर निवडूक लढण्याची तयारी जरांगेंनी केली होती. कालपासून ते 13- 14 जागांवर लढणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. मुस्लीम आणि दलित समाजाच्या प्रतिनिधींकडून यादी न आल्याने आपण लढणार नाही, असं जरांगे म्हणालेत.

मनोज जरांगेंनी माघार का घेतली?

काल दिवसभर मतदारसंघानुसार सगळ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. मतदारसंघ सुद्धा ठरले, काही कमी तर काही वाढले असतील. मराठा समाजाने मतदानावर लढायचं आहे. आमच्या मित्र पक्षाची आणखी यादी आली नाही. लढायचं जमेल का? यादीच नाही म्हणल्यावर… एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे एकटयाने कसं लढायचं. यावर रात्री आमची चर्चा झाली. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबून घेतलेलं बरं राहीन, असं मनोज जरांगे म्हणालेत.

मनोज जरांगे काय म्हणाले?

एका जातीवर निवडणूक लढवून जातीचं हसू करून घेऊ का? राजकारण हा आमचा कुठं खानदाणी धंदा आहे… माघार घेणारी औलाद नाही आमची… एका जातीवर निवडून येत नाही, म्हणून उमेदवार देणार नाही. हा गनिमी कावा आहे. मी कालपासून सांगतोय, तिघांचं समीकरण आहे, पण यादीच आली नाही, समाजाला एक सांगणं आहे,तुमच्या मतदारसंघातल्या एकाला मदत करायचं तर करा पण त्याच्याकडून लिहून घ्या, असं मनोज जरांगे म्हणालेत.

आम्हाला एका जातीवर शक्य नाही, ते दोन्ही पण बांधवच आहेत. ते पण नवीन आहेत आणि मी पण… काल यादी यायला पाहिजे होती पण नाही आली, मग लढायचं कसं? राज्यतल्या सर्व भावांना सांगतो सगळे जण अर्ज काढून घ्या. मुस्लिम आणि दलित उमेदवारांची यादी न आल्यामुळे, आणि एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत म्हणून उमेदवार देणार नाहीत. सज्जाद नोमानी यांची यादी आली नाही. निवडणूक लढवायची नाही पूर्ण पडायचे आहे. आपले अर्ज लवकर काढून घ्या, आपण कोणत्याही पक्षला पाठिंबा दिला नाही. एका जातीवर लढणं साधी सोप्पी गोष्ट नाही, असं जरांगे म्हणाले आहेत.