मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात भव्य सभा झाली. या सभेला महाराष्ट्रभरातून लोक आले होते. सभास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या 10 दिवसात सरकारने याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जरांगे यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी या सभेतून सरकारकडे आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र द्या आणि मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.