जालना | जालना जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat Election) नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज पार पडली. पाच नागरपंचायती पैकी जाफराबाद, तिर्थपुरी, घनसावंगी या तीन नगरपंचायतीवर घड्याळाचा (NCP) गजर वाजलाय या तिन्ही नागरपंचायतीवर राष्ट्रवादीचे नागराध्यक्ष विराजमान झाले असून, बदनापूर नागरपंचायतिच्या नगर अध्यक्षपदी भाजपा (BJP) तर मंठा नागरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला आहे. पाच पैकी 4 नगर पंचायतीवर महिला नगराअध्यक्ष झाल्या आहेत. काल अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. कार्यकर्ते आणि नेत्यांनी विजयी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. तसेच विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले आणि नगरपंचायतींच्या समस्या सोडवण्याचे तसेच विकासकामे करण्याचे आश्वासन दिले.
जालन्यातल्या पाच नगरपंचायतींपैकी चार नगरपंचायतींवर अध्यक्षपदी महिला सदस्यांची वर्णी लागली आहे. ती खालीलप्रमाणे-
मंठा- मीरा बोराडे ( शिवसेना )
बदनापूर – मंगल बारगजे ( भाजपा )
जाफराबाद – सुरेखा लहाने ( राष्ट्रवादी )
तिर्थपुरी – अलका चिमणे ( राष्ट्रवादी )
घनसावंगी- पांडुरंग कथले ( राष्ट्रवादी )
जाफराबाद नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या डॉ. सुरेखा लहाने नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शेख रऊफ शेख रहीम यांची निवड झाली. येथील निवडणुकीत काँग्रेस 06, राष्ट्रवादी 06, भाजप 01, अपक्ष 04 असे संख्याबळ होते. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे दोन सदस्य व एक अपक्ष सदस्यांचे समर्थन मिळवत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.
बदनापूर नगरपंचायतीत भाजपच्या मंगल बारगजे तर उपाध्यक्षपदी शेख समीर यांची निवड झाली. या निवडणुकीत भाजपला 9, काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 5 व अपक्षांना 2 जागा मिळाल्या होत्या.
मंठा नगरपंचायत अध्यक्षपदी शिवसेनेच्या मीरा बाळासाहेब बोराडे तर उपाध्यक्षपदी इरमसबा रशीद खाटीक यांची बिनविरोध निवड झाली. या 17 सदस्य असलेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे 12, काँग्रेसचे 2, भाजपचे 2 तर राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडून आला.
तीर्थपुरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचत्या अलका अण्णासाहेब चिमणे तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शैलेंद्र पवार यांची वर्णी लागली. या ठिकाणी भाजपला-2
शिवसेना-3, राष्ट्रवादी-11, काँग्रेस-1असे संख्याबळ आहे.
घनसावंगी नगरपंचायत निवडणुकीत अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे पांडुरंग कथले तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या शेख मुमताज शेख कासम यांची निवड करण्यात आली. इथे राष्ट्रवादीच्या ताब्यात 10 जागा तर शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत.
इतर बातम्या-