आजची घोषणा सरकारला झेपणार नाही, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

| Updated on: Oct 22, 2023 | 3:03 PM

Manoj Jarange Patil on Maratha Reservation at Antarwali Sarati: बैठक संपली, आता मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद; सरकारला इशारा, म्हणाले, आता हे आंदोलन पेलणार नाही! सरकारने 24 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा आम्ही आंदोलन उभं करू, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

आजची घोषणा सरकारला झेपणार नाही, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Follow us on

अंतरवली सराटी, जालना | 22 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जात उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला. या वेळात मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, असं जरांगे यांनी म्हटलं होतं. मनोज जरांगे यांनी सरकार दिलेल्या अल्टिमेटमचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. अशात आज जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा समाजाची बैठक पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना संबोधित केलं. यावेळी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. आपण जी भूमिका घेऊ त्यावर आता ठाम राहायचं. जगाला आता आपण शांततेतील युद्ध दाखवून देऊ. शांततेत आपल्याला भूमिका मांडायची आहे. आंदोलन करायचं आहे. तीन वाजता आपण आपली भूमिका मांडू. पण आजची घोषणा सरकारला झेपणार नाही. मराठ्यांचं आंदोलन सरकारला पेलणार नाही. या दोन वाक्यांचा अर्थ टप्प्यात आल्यावर कळेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

आतापर्यंत आपल्या 67 बांधवांनी बलिदान दिलं. पण आपल्याला आरक्षण मिळालं नाही. ज्यांनी बलिदान दिलं ते वाया जाऊ द्यायचं नाही. आजपासून एकानेही आत्महत्या करायची नाही. हे घरा घरातील मराठ्यांनी समजून घ्यावं. कारण आत्महत्या करून आरक्षण मिळणार नाही. आपण एकत्र लढू. आरक्षण मिळवूनच शांत बसूयात, असं जरांगे पाटील म्हणाले.

मी तुमचे पोरंग आहे, मी आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही. माझ्या खांद्याला खांदा देऊन उभे राहा. आपण आरक्षण मिळवूनच राहू, असं जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनं EWS नावाचं नवं पिल्लू आणलं आहे. आता तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी बसून आरक्षण निर्णय मार्गी काढावा. म्हणजे 26 तारखेला मराठा समाज त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत. अन्यथा आम्ही मागे हटणार नाही, असं जरांगे म्हणाले.