जालना: तोंडात बोळा कोंबून, हात-पाय बांधून बेदम मारहाण करत एका व्यवसायिकाचे थरारक अपहरण (Kidnapping) झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. तालुक्यातील मादळमोही येथील व्यावसायिकाचे तीन अज्ञातांनी साठेवाडी फाट्यावरून अपहरण केले. अपहरण केल्यानंतर व्यावसायिकाला भरधाव वाहनात बेदम मारहाण (Jalna Crime) करण्यात आली. दहा लाख रुपयांची खंडणी दे नाही तर जीवे मारतो, अशी धमकी देण्यात आली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने व्यावसायिकाला धावत्या वाहनातून तलावात फेकून देण्यात आली. त्याची जीपही कालव्यात ढकलून दिली आणि दुसऱ्या वाहनातून अपहरणकर्ते फरार झाले. 26 जानेवारी रोजी पात्री ही घटना घडली.
जालन्यातील कैलास शिंगटे या व्यावसायिकाचे अहरण झाले होते. जेसीबी, पोकलेनचा त्यांचा मोठा व्यवसाय आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ते दुचाकीवरून कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गावरून येत होते. त्यावेळी साठेवाडीजवळ त्यांच्या दुचाकीला जीपने जोरात धडक दिली. खाली कोसळलेल्या कैलास शिंगटेंना अपहरणकर्त्यांनी उचलून जीपमध्ये टाकले. यानंतर त्यांच्या तोंडात बोळा कोंबूीन हातपाय बांधले. डोळ्यावर पट्टी बांधून मारहाण करत तब्बल दहा लाखांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना दाभणाने जखमी केले. मात्र रस्त्यातच जीपचे डिझेल संपल्याने अंतरवाली सराटी शिवाराजवळील कालव्यात त्यांनी जीप ढकलून दिली. त्यानंतर दुसरी गाडी बोलावून अपहरणकर्ते फरार झाले. औरंगाबाद-सोलापूर मार्गावरील सौंदलगाव शिवारात कैकलास शिंगटे यांना गाडीतून खाली फेकून दिले.
त्यानंतर कैलास यांनी जवळच्या हॉटेलवर येऊन घरी फोन करून घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी कैलास शिंगटे यांच्यावर वडीगोद्री येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले. त्यानंतर कुटुंबीय पोहोचले. शिंगटे यांनी गोंदी ठाण्यात तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा चकलांबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. अपहरणकर्ते कोण आहेत, पैशांशिवाय त्यांचा इतर काही हेतू होता का, या सर्व प्रश्नांचा तपास पोलीस करत आहेत.
इतर बातम्या-