Manoj Jarange Patil Sabha : अजितदादा, भुजबळांना जरा समज द्या, नाहीतर माझ्या नादी लागले तर…; मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा

| Updated on: Oct 14, 2023 | 12:47 PM

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal Ajit Pawar : अजितदादा, भुजबळांना जरा समज द्या, नाहीतर माझ्या नादी लागले तर...; मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळ यांना थेट इशारा. देवेंद्र फडणवीस यांनाही जरांगे यांनी आवाहन केलं आहे. अंतरवलीच्या सभेत काय म्हणाले जरांगे पाटील? पाहा...

Manoj Jarange Patil Sabha : अजितदादा, भुजबळांना जरा समज द्या, नाहीतर माझ्या नादी लागले तर...; मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा
Follow us on

अंतरवली सराटी, जालना | 14 ऑक्टोबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी गावात सभा होत आहे. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मी अजितदादांना विनंती करतो. छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी दहा दिवसात आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी मराठ्यांना उचकवायला सांगितलं आहे. त्यासाठीच छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते हे बोलत आहेत. पण आम्ही मराठे शांततेच्या मार्गानेच लढू. उद्रेक जाळपोळ होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय मागेही हटणार नाही. छगन भुजबळ यांनी आता घरात बसावं, असं जरांगे पाटील म्हणालेत.

मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोवर मी एक इंचही मागे हटणार नाही. आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे. 24 तारखेच्या आत आरक्षण मिळालं नाही तर मी मागे हटणाक नाही. एकतर मराठ्यांना आरक्षण मिळेल. त्याचा जल्लोष होईल किंवा माझी अंतयात्रा निघेल. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोवर मी माझ्या घराचा उंबराही शिवणार नाही, असं जरांगे पाटील म्हणालेत.

“माझं फेसबुक अकाऊंट बंद केलं”

मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी माझं फेसबुक अकाऊंट बंद केलं. पण फेसबुक अकाऊंट काय आहे? लोक एवढे जमलेत. त्या पुढं फेसबुक अन् इंटरनेट काय आहे? आता आम्हा मराठ्यांना रोखू शकत नाहीत, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. तुम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 40 व्या दिवशी काय करणार हे सांगू शकत नाही. आम्ही तीव्र आंदोलन करू, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.