मनोज जरांगे पाटील बिग बॉसमध्ये शोभणारा माणूस…; कट्टर विरोधकाकडून जोरदार टीका

| Updated on: Sep 19, 2024 | 3:40 PM

Laxman Hake on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील बिग बॉसमध्ये शोभणारा माणूस, असं लक्ष्मण हाके म्हणालेत. जालन्यात माध्यमांशी बोलताना मनोज जरांगेंबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

मनोज जरांगे पाटील बिग बॉसमध्ये शोभणारा माणूस...; कट्टर विरोधकाकडून जोरदार टीका
मनोज जरांगे
Follow us on

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यातील वडिगोद्री इथं आजपासून लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू होणार आहे. याआधी लक्ष्मण हाके उपोषणस्थळी लक्ष्मण हाके पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हाके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणजे तमाशातील सोंगाड्या… त्याच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री जीआर काढतात. आजी, माजी मुख्यमंत्री जरांगेकडे जातात पण ओबीसीकडे कोणीही विचारपूस करत नाहीत. पृथ्वीराज चव्हाण हा सरकार दरबारी माणूस जरांगेकडे जातात पण ओबीसीकडे येत नाहीत. जरांगे पाटील हा बिग बॉस मध्ये शोभणारा माणूस…, अशा शब्दात लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे.

मनोज जरांगेंवर निशाणा

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री व्हावं त्यासाठी आमच्या शुभेच्छा… पण जरांगे मुख्यमंत्री झाला किंवा त्याचा बाप शरद पवार जरी आला तरी ओबीसीतून मराठा आरक्षण देता येणार नाही. मनोज जरांगे याने आपल्या बॅनरवर तुतारीचे चिन्ह लावावे. आम्हाला म्हणतात आम्ही भुजबळ, फडणवीस यांचे समर्थक आहोत असे आरोप करतात. होय आम्ही त्याचे समर्थक आहोत मग तुम्ही कोणाचे समर्थक आहात?, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी विचारला आहे.

हैद्राबाद गॅजेटबाबत हाके काय म्हणाले?

हैद्राबाद गॅजेट 1911 चा असेल आणि शासन तो ग्राह्य धरून मान्य करत असेल तर मागासवर्ग आयोग कशाला केला. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय जीआर काढता येत नाही. जरांगेच्या सांगण्यावरून जीआर काढत असाल तर अवघड आहे. बेकायदेशीर जीआर काढू नये अशी आमची मागणी आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान यांना प्रश्न आहे की, हायकोर्टाचे जजमेंट पायदळी तुडवले जात आहे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय.

जर हैद्राबाद गॅझेट जर लागू केले तर आम्ही जस्टीस रोहिणी आयोगाचा रिपोर्ट आम्ही कोर्टाला पाठवू. जर तरीही सरकारने भूमिका घेतली नाही तर आम्ही मुंबईला जाऊ. आम्ही ओबीसी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करतोय त्यात गैर काही नाही. आम्ही त्याच्या सोबत आहोत आमच्यात कुठेही मतभेद नाही. आम्ही एका बॅनरखाली बसलोय आमच्यात मतभेद नाही, असं हाके यांनी म्हटलं आहे.