महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. या 31 ऑक्टोबर रोजी ते पत्ते उघडणार, असे सांगण्यात येत होते. पण त्यांनी या निवडणुकीसाठी MMD चा फॉर्म्युला दिला. मराठा, मुस्लिम आणि दलित मतांची त्यांनी मोट बांधणार असल्याचे सांगितले. मराठ्यांसोबत आता मुस्लिम आणि दलित मतांच्या बळावर सत्ताधाऱ्यांना दणका देण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला. आता उद्या 3 नोव्हेंबर रोजी उमेदवार कोण या सस्पेन्सवरून पडदा हटणार आहे. उद्या ते मतदारसंघातून कोणता उमेदवार असेल हे जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
MMD नुसार मतदारसंघ
आमच्या तिघाचं मराठा, दलित, मुस्लिम समीकरण जुळलं. त्यासंदर्भात कुठले मतदारसंघ सोडायचं यावरती आज चर्चा होईल, असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. हे समीकरण होत असताना महाराष्ट्रातील सर्वाना फॉर्म भरायला सांगितलं होत, त्यामुळे एकजण द्यावं लागणार आहेत आणि बाकीच्यांना अर्ज माघे घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे आजच उद्याच्या बैठकीची आणि उमेदवार घोषणेची तयारी करण्यात येणार आहे. उद्या लवकरात लवकर उमेदवार जाहीर करण्याचा त्यांचा मानस आहे.
तुम्हीच एक जण निवडा
आज सर्वांनी आपल्या मतदारसंघात बैठका घ्या, आणि त्यातून तुम्ही तुमचा एकजण ठरवा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. कोणता मतदारसंघ आणि कोण उमेदवार हे उद्या आम्हाला डिक्लेर करायचं आहेत, असे ते म्हणाले. म्हणून आजच्या आज तुम्ही ताकतीने तयारी करा. बैठका घ्या आणि एकमताने सगळयांनी एक उमेदवार ठरवा.
उद्या पाच वाजता करणार उमेदवारांची घोषणा
उमेदवार नाही ठरला तर सगळ्या उमेदवारांनी अंतरवाली सराटीला या. उद्या सकाळी सात वाजता फक्त उमेदवारांनी अंतरवाली सराटीला यावे सोबत कुणालाही आणू नका. उमेदवार निवडीबाबत मिरीट हे पक्षात असतं, इथं मतदान आहेत. मराठा दलित मुस्लिमांचं मतदान करायचं आणि निवडून आणायचं, मतदानाच्या पुढे सर्व सर्व फेल होतात. तिघाचं मतदान मोठं आहे, कुणालाच लीड तुटणार नाही. मला तीन तारखेला तीन वाजण्याच्या आता ठरवून घ्यायचं आणि पाच वाजता उमेदवार घोषित करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात उमेदवार देण्याबात चर्चा सुरु आहे, उद्या तीन तारखेला सांगणार असल्याचे ते म्हणाले.