जालना | मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे अंतरवाली येथून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. यादरम्यान जरांगे हे भांबेरी गावात थांबले आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचलं असून त्यांच्यासाठी मी काटा ठरत आहे म्हणून त्यांना मला मारायचा असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते, नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना पुढे केलं आहे. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे. कायदा सुव्यवस्था बिघाडली नाही पाहिजे याची काळजी न्यायालयाने नाहीतर राज्य सरकारने घेतली पाहिजे. भाजला सत्ता आणण्यासाठी मराठा समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मी काटा ठरत आहे त्यामुळे मला त्यांना मारायचं आहे. मलाही बघायचंय की देवेंद्र फडणवीसांमध्ये किती दम आहे. मराठ्यांना जे ७५ वर्षात मिळालं नाही ते या पोराने मिळवून दिलं, दिलेलं १० टक्के आरक्षण दिलं ते मान्य केलं नाही, सगेसोयऱ्यांचाी अंमलबजावणी मागणी केली. माझ्यावर कोणते गुन्हे आहेत का सर्व पाहिलं पण काहीच मिळालं नाही. त्यामुळे मला संपवणं हाच फडणवीसांचा डाव असल्याचं म्हटलं आहे.
भांबेरापासून मला एकटयाला जाऊ द्या तुम्ही माघारी फिरा. मला दहा टक्के आरक्षण मान्य करायला लावलं पण मी नाही केलं. बरं केलं तर तुम्ही आमचे सगेसोयऱ्यांवर अंमलबजावणी करा मीसुदधा उपोषण करता नाही, असं जरांगे म्हणाले. मनोज जरांगे दुपारी अंतरवाली येथून निघून आले होते. आता ते भांबरा या गावामध्ये थांबले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी चांगले-चांगले नेते गप केले. भाजपच नाहीतर सर्व पक्षातील मराठा नेत्यांनी नीट झक मारावी. कोणता पक्ष म्हणून नाहीतर एक मराठा म्हणून बोला, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.