जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 11 वा दिवस आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठी समाजाला एक महत्त्वाच आवाहन केलं आहे. “वाढता पाठिंबा बघून आपल्याला यश मिळण्य़ाची शक्यता जवळ आहे. बांधवांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आरक्षण पाहिजे. मराठा समाजाने आंदोलनं करावी, पाठिंबा वाढवावा पण कुठेही गालोबट लागेल असं आंदोलन करु नये, हे अंतरवालीच्या या ठिकामाहून हातोजडून मी सगळ्यांना आवाहन करतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“ज्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे आरक्षण लागतं, त्या विद्यार्थ्यांनी, मुलांनी, मराठी समाजाच्या तरुणांनी, बांधवांनी कोणी टोकाचं पाऊल उचलू नये. त्याचं कारण आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठी जीवाची बाजी लावतोय. तुम्ही असं केलं तरं, आरक्षण कोणाला द्यायच?” असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. “तुम्ही शिक्षण घेणार, भविष्य घडणार आहे. म्हणून आम्ही हा लढा लढतोय. प्रत्येक मराठ्याच्या घरातील विद्यार्थ्याने मिळालेल्या आरक्षणाचा फायदा उचलला पाहिजे. टोकाचा निर्णय घेतला तर आरक्षणाचा फायदा उचलणार कोण?” अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील मराठा समाजाल कळकळची विनंती आहे, की….
“यापुढे कोणीही टोकाच पाऊल उचलण्याचा प्रकार करु नये. कोणीही उग्र आंदोलन करु नका. दगडफेफ, कायदा-सुव्यवस्था बिघडेल असं काही करु नका. तरुण विद्यार्थी, मुलांवर गुन्हे दाखल होऊ नये, शिक्षणात अडचण येईल. आम्ही आंदोलन करत असताना, अशा प्रकारे आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. ही माझी मराठा समाजाला विनंती आहे. मराठा समाजाने शांततेत, लोकशाही मार्गाने आंदोलन करावं. ही माझी महाराष्ट्रातील मराठा समाजाला कळकळची विनंती आहे. पिशव्या भरुन ठेवल्या आहेत. निरोपाची वाट बघतोय. चार दिवसाची मुदत दिली होती, उद्या शेवटचा दिवस आहे. निरोप न आल्यास सलाईन बंद करू, म्हणजे आरोग्य सेवा घेणे बंद करणार” असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.