महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचा विजय झाला. नाशिकच्या येवला या मतदारसंघातून 26 हजार 681 मतांनी छगन भुजबळ विजयी झाले आहेत. या मतदारसंघातील ओबीसी विरूद्ध मराठा अशा झालेल्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. निवडणूक जिंकल्यानंतर काल झालेल्या विजयी रॅली काढली तेव्हा काही लोकांनी पहाटे तीन वाजेपर्यंत सभा घेतल्या. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही, असं म्हणत भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे. यावर आता जरांगे यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.
येडपटा तुला सांत्वन भेटी कळतात की नाही, मी राज्यात कुठे गेलो का? आलेले सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेलं आहे. आम्ही मैदानात पाहिजे होतो तेव्हा दाखवला असता कचका आमच्या पॅर्टनचा… मराठा आरक्षण लवकर द्यायचं ,बेमानी करायची नाही. मी आणि माझा मराठा समाज मैदानात नव्हतो. सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यायचं नाही तर पुन्हा मराठे छाताडावर बसणार आहे. आमच्याशी बेमानी करायची नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे.
तुमचं सरकार स्थापन झाले की बैठक घेऊन लगेच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार आहे. सरकार आलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने अभिनंदन देखील केल पाहिजे. आमचं समीकरण जुळलं नाही म्हणून आम्ही बाजूला राहिलो. कोणाचेही सत्ता आली तरी मला आणि समाजाला संघर्ष करावा लागणार आहे. कोणीही माजात आणि मस्तीत राहायचं नाही हुरळून जायचं नाही. मराठ्यांना छेडण्याचं काम करायचं नाही. मी निवडणुकित सांगितलं होतं मराठा समाज मालक आहे योग्य लोक निवडा… मी मराठा मुक्त केला होता, मी कोणाच्याही दावणीला बांधला नव्हता, असं जरांगे म्हणालेत.
मराठ्यांशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की मराठा समाज भाजपसोबत होता. मराठ्यांची विभागणी होऊ शकत नाही. मीच मराठा समाजाला मुक्त केल होतं. मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं आहे. मी मैदानात नव्हतो तर फॅक्टर फेल कसा झाला? एक महिन्याभर थांबा तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले आहेत. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाही, असं जरांगेंनी म्हटलं आहे.