वाट लावल्याशिवाय सोडणार नाही…; निवडणुकीच्या घोषणेआधी जरांगेचा सरकारला कडक शब्दात इशारा

| Updated on: Oct 15, 2024 | 1:55 PM

Manoj Jarange Patil on Vidhansabha Election 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर.....

वाट लावल्याशिवाय सोडणार नाही...; निवडणुकीच्या घोषणेआधी जरांगेचा सरकारला कडक शब्दात इशारा
मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक
Follow us on

मराठा आरक्षणासाठी सरकारचे काय नियोजन आहे, मला माहित नाही. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांवर दुर्लक्ष करू नये. पुन्हा पुन्हा दुर्लक्ष केले तर, याचे दुष्परिणाम वाईट होतील. ज्या रस्त्याकडे मराठा समाजाला जायचे नाही. त्या रस्त्याकडे फडवणीस यांच्या हट्टामुळे, मराठा द्वेषीपणामुळे, मराठ्यांना विनाकारण राजकारणाच्या रस्त्यावर यावे लागेल. मराठा त्या राजकारणाच्या वाटेवर आला. तर तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्याआधी जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारला घेरलं आहे.

“अजूनही वेळ गेलेली नाही”

आमच्या मागण्याच्याची अजून वेळ गेलेली नाही. सर्व मागण्याची अंमलबजावणी करा. तुमचे राजकारण तुमची सत्ता तुम्हाला लख लाभ असो… मला आणि माझ्या मराठ्याला राजकारणाकडे जायचे नाही. पण तुम्ही जर मराठ्यांवर दुर्लक्ष करून अन्याय करण्यासाठी सत्ता चालवत असताल. जर तुम्ही आमची वाट लावायला चालले तर माझे मराठे तुमची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. तुमच्या हातात अजूनही वेळ आहे. तुम्ही आचारसंहितेची तारीख पुढे ढकलून मराठ्यांना न्याय देऊ शकता, असं मनोज जरांगे म्हणाले.

जसे तुम्ही आता कोणाचीही मागणी नसताना 16- 17 जाती आरक्षणात घातल्या. तेही मराठ्यांना छेडून आणि मराठ्यांना खवळून त्यांनी घेतलं. तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. ही जी खुन्नस दिली, त्याचे त्याचे परिणाम इतके वाईट होतील की तुम्हाला पश्चाताप करायला वेळ राहणार नाहीस अशा शब्दात जरांगेंनी इशारा दिला आहे.

अस्मान दाखवणार; जरांगेंचा इशारा

आचारसंहिता लागुद्या मग त्यांनाही कळेल. या राज्यातील शेतकरी, दलित, मुस्लिम, आणि आठरा पगड जातीचे कर्तव्य काय त्यांच्या लक्षात येईन. माझे पुन्हा पुन्हा म्हणणे आहे. तुम्ही मराठ्यांकडे दुर्लक्ष करून, आमचा अपमान करू नका. तुम्ही मराठ्यांच्या छातीवर नाचून, तुम्ही सत्ता काबीज करायला बघताल, हा तुमचा गैरसमज आहे. या राज्यात मराठ्यांच्या नादी लागलेल्याचा मराठ्यांनी बिमोड केलेला आहे. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, आम्हाला राजकारणात जायचे नाही. तुम्ही सत्तेवर राहा किंवा, नका राहू, आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, नसता तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय सोडणार नाही, असं जरांगे म्हणाले.