Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील-रावसाहेब दानवे यांच्यामध्ये मध्यरात्री काय चर्चा झाली?

| Updated on: Sep 14, 2023 | 7:45 AM

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु आहे. अजून यावर तोडगा निघालेला नाही. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी गेले नाहीत. रात्री उशिरा रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील-रावसाहेब दानवे यांच्यामध्ये मध्यरात्री काय चर्चा झाली?
Maratha Reservation protest
Follow us on

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा 17 वा दिवस आहे. मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. सरकारने जरांगे पाटील यांची आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी 30 दिवसांची मुदत मागितली आहे. सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात मागच्या काही दिवसांपासून वाटाघाटी सुरु आहेत. पण अजून यावर तोडगा निघालेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारकडे पाच अटी ठेवल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवाली सराटी येथे यावं, त्यांच्यासमोर उपोषण सोडून असं मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. पण काल मुख्यमंत्री तिथे गेले नाहीत. रात्री उशिरा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन आंदोलन स्थळी गेले होते.

“आज मुख्यमंत्री येणार होते, परंतु आता 10 वाजले तरी मुख्यमंत्री आलेले नाहीत. आम्ही सरकारच्या शब्दाला डाग लागू दिला नाही. जे प्रस्ताव दिले ते आम्ही मान्य केले. त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली ती आम्ही दिली. मी आता आमरण उपोषण आणि नंतर साखळी उपोषण करणार. आम्ही सरकारला वेठीस धरले नाही, सरकारने आम्हाला वेठीस धरले. आम्ही चांगले आणी वाईट बोलणार नाही. आले आणि नाही आले तरी आम्ही नाराज होणार नाही. एक महिना दिला आहे तो पर्यत आम्ही विचारणार नाही पण एक महिना झाला की प्रश्न विचारणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मीच सर्व पर्याय देतो, सरकार देत नाही. सोळा दिवस झाले तरी मेडिकल घेत असल्यामुळे बोलत आहे. आता आम्ही ठाम आहोत. आज मुख्यमंत्री यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांच्या भेटीआधी मनोज जरांगे पाटील यांनी ही वक्तव्य केली.

रावसाहेब दानवे चर्चेनंतर काय म्हणाले?

रावसाहेब दानवे, गरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील व यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. रात्री जवळपास तीन ते साडेतीन तास चर्चा सुरु होती. “उपोषणाचा 17 वा दिवस आहे. महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातुन प्रतिसाद मिळाला आणि लाखो लोक त्यांना भेटून गेले. चर्चा समाधानकारक झाली. आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलेल. आम्ही तिघांनी त्यांच्या टीम सोबत चर्चा केली. आम्ही मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. चर्चा करून निर्णय घेऊ. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आलो आहोत. मी दिल्ली वरून आलो आणि गिरीश महाजन मुंबईवरून आलो” असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.