मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी खूप चांगलं मानतो. पण 100% सरकारने मला खेळवले. विमानतळावर सीसीटीव्ही अमुक सर्व आहे. कोण गेलं कोण उतरला कळतं. मुख्यमंत्र्याला बदनाम करण्याचं ओएसडीचं काम आहे. वेळोवेळी असंच होत राहिले तर समाज तरी किती दिवस गप्प बसणार आहे? कदाचित माझे शेवटचे उपोषण असेल. असंच तुम्ही खेळवत राहिले तर मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल, असं मनोज जरांगे म्हणालेत.
ओएसडी कोण? असा प्रश्न पत्रकारांनी जरांगेंना विचारला. त्यावर समाजालाही माहिती आहे. 15 लाख वाटायला कोणता ओएसडी निघाला होता… हमेशा हमेशा मध्ये मध्ये बुळबुळ कोण करतो. थांबा नावच घेईल पुढचे… षडयंत्र काय करतो ते पाहू. त्यांनी ते षड्यंत्र नाही थांबवलं तर धडाधड नाव घेऊ… तीन नाव आमच्याकडे आली आहेत. प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय कसं मंत्रिमंडळाचे लोक येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय समाधानी कोणावर विश्वास ठेवायचा? असं मनोज जरांगेंनी म्हटलं.
मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे. ते कोणीही द्या… आमचा एकनाथ शिंदे साहेबांवरती सरकारवरती आजही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे शत्रू नाहीत. आमचे हे मी मागे सांगितलं आहे की ते कार्य करतात. ते आपल्याला जमत नाही. जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलले की मी कोणाचे खपवून घेत नाही. त्यांनी हे सर्व बंद करावं ते काय माझे शत्रू आहेत का? आमचा सगळ्यांवरतीच विश्वास आहे आम्हाला आरक्षण द्या कोणीही द्या मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मी एकनाथ शिंदेसाहेबांना आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो की, मी असंच उपोषण स्थगित करू शकत नाही. काही गोष्टी डिटेल्समध्ये माहिती झाल्या पाहिजेत. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही लगेच करणार का? किती दिवसात करणार आहात? केसेस लगेच मागे करणार की किती दिवसात करणार? हे मला डिटेल्स पाहिजेत, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय.