मनोज जरांगेंचं ठरलं… विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार की पाडणार?; म्हणाले…

| Updated on: Oct 20, 2024 | 3:13 PM

Manoj Jarange Patil on Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाची बैठक घेतली. जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांशी निवडणुकीच्याबाबत चर्चा केली. तेव्हा जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मनोज जरांगेंचं ठरलं... विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार की पाडणार?; म्हणाले...
Image Credit source: Facebook
Follow us on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगेंनी मराठा बांधवांशी संवाद साधत विधानसभा निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेतला. जिथं निवडून येऊ शकतो, अशाच मतदारसंघात उमेदवार द्यायचा. जिथं निवडून येऊ शकत नाही. त्या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, असा निर्णय मनोज जरागे पाटील यांनी घेतला आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

जिथे निवडून येईल तिथे उभा करू. SC, ST चा आपल्या विचारांचा उमेदवार निवडून देऊ. आपल्या मागण्या मान्य असल्याचं जो उमेदवार स्टॅम्पवर आपल्याला लिहून देईल त्याला पाठिंबा देऊ. कोणत्या मतदारसंघात उभं करायचं हे मी दोन ते तीन दिवसात मतदा संघ सांगतो. तुम्ही सगळ्या 288 मतदारसंघात अर्ज भरून ठेवा. एका मतदारसंघात दोघा तिघांनी अर्ज भरा. मग आपण बघू की कोण निवडून येऊ शकतो. ज्यावेळी मी सांगेन की अर्ज मागे घ्यायचा. आपण चौफेर वार करायचा आहे. यांची चिरफाड अशी करावी लागणार आहे. अर्ज काढून घे म्हटलं तर नाराज व्हायचं नाही. ज्यांनी मराठ्यांना संपलं त्यांना संपवायचंच गप्प बसायचं नाही. आता तुम्ही फॉर्म भरून या तुमचे पैसे बुडणार नाहीत काढून घे म्हटलं की तुमचे पैसे वापस येतील. नंतर आपण मेरीट नुसार ठरवू, असंही मनोज जरांगे म्हणालेत.

जिथे निवडून येऊ शकतात त्याच ठिकाणी उभा करावेत. SC आणि ST च्या जागेवर आपण उमेदवार देऊ नये. तो कोणत्याही पक्षाचा असो आपल्या विचाराचा असला की लाखभर मतदान फुकट द्यायचा आणि निवडून आणायचा. ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येत नाहीत. त्या ठिकाणी जो आपल्याला 500 रुपयांच्या बॉण्ड वर लिहून दे. जो तुमच्या मागण्याशी संमत आहे. त्यालाच मतदान करा, असं मनोज जरांगे म्हणालेत.

तेव्हा अर्ज मागे घ्यायचा- जरांगे

एक कोपरा धरून चाललो तर मराठा हरवू शकतो. संमिश्र ठेवलं तर मराठा जिंकू शकतो. जिल्ह्याच्या वतीने सुद्धा दहा-बारात लोक येत जा आणि मला सांगत जा. काही पाडू काही निवडून आणू काही पाठिंबा देऊ. फॉर्म काढ म्हटलं की फॉर्म काढायचा, ऐकलं नाही तर मी अंग काढून घेणार आहे. SC , ST मतदारसंघात एक लाखाच्या वर मतदान आहे. तिथे आपल्या विचाराचा निवडून देऊ. आपल्या मागण्या मान्य असणाऱ्याला आपण मतदान द्यावं मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असू द्या, अशाही सूचना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना केल्या आहेत.