लोकसभा निवडणुका पार पडल्यावर मनोज जरांगे पाटील आता परत एकदा चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी परत एकदा सत्ताधारी आणि विरोधकांना अंगावर घेतलं आहे. मनोज जरांगे यांनी आज म्हणजेच 8 जूनला उपोषणाला सुरूवात केली आहे. यावेळी जरांगेंनी आमचं आम्हाला आरक्षण द्या नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नाव घेऊन तुमचे उमेदवार पाडणार असल्याचा इशारा दिलाय. इतकंच नाहीतर जरागेंनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनाही मराठा-ओबीसा वादाच्या धागा पकडत कडक इशाराच देऊन टाकला आहे.
विजय वडेट्टीवारांना वर तंगड्या करायच्या असतील, जर ओबीसींना धक्का लागायची भाषा केली तर त्यांना विधानसभेत धक्का लागेल, चुकल्यावर मी काय करू? मी सत्ताधारी आणि विरोधक सगळ्याना अंगावर घेतो. 4-5 महिन्यांनी आणखी तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे, मग येऊ द्या नवीन लोक, जे लोक माझ्या जातीला त्रास देतील त्यांना विधानसभेत पाडणार म्हणजे पाडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी वडेट्टीवार यांना सांगितल असेल मराठ्यांच्या विरोधात बोल म्हणून फडणवीस यांनी मागण्यांबाबत आम्हाला अर्धवट लटकून ठेवलं आहे. कुणबी प्रमाणपत्र निघुनही काहीही फायदा नाही, जोपर्यत माझ्यात जीव आहे तोपर्यंत मी लढणार आहे. काही जण मराठ्यांच्या विरोधात भाषणं करत आहेत. तुमच्या जातीचे उमेदवार आम्ही पाडून टाकू, असं इशाराही जरागेंनी दिला आहे.
फडणवीस साहेब तुम्ही भ्रमात राहू नका जे घडलेले आहे ते मान्य करा. मराठ्यांच्या पोरांना आरक्षणाचा फायदा करून द्या आम्हाला आरक्षण द्या, गुन्हे मागे घ्या, मला राजकारणात जायचं नाही, आम्हाला आरक्षण द्या, जर तुम्ही मागण्या पूर्ण केल्या तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला एकालाही निवडून येऊ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.