मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं सध्या उपोषण सुरु आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळगावी जरांगेंचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. अशात राज्यातील मराठा समाजाकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाज कडून आज परभणी बंदची हाक दिली गेली आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनात जालना बंदची हाक देण्यात आली आहे. शिवाय परभणी आणि पुण्यातही बंद पाळला जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आज अखंड मराठा समाजाकडून जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. काल वडीगोद्री फाटा इथं मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झालेला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर वडीगोद्रीत सुरू असलेल्या ओबीसी आंदोलन स्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वडीगोद्री येथून अंतरवली सराटी गावाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाज कडून परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं बंद ठेवली आहे. बीड जालना पाठोपाठ आज परभणीत बंद असणार आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मराठा समाजाने बंद पुकारला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात मराठा समाजाकडून बंद पाळण्यात येणार आहे. तर पुणे शहरात मात्र हा बंद पाळला जाणार नाही. पुणे शहरात सर्व व्यवहार सुरळितपणे सुरू असणार आहेत.
ओबीसी आरक्षण बचावासाठी जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. सकाळी जालन्याचा वैद्यकीय पथक त्यांची तपासणी केली दोघांचाही बीपी सध्या तरी स्टेबल आहे. मात्र दोघांनीही आता उपचार घेण्याची गरज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आरोग्य प्रशासनाकडून तशी उपचार घेण्यासाठी विनवणी देखील करण्यात आली आहे.