Manoj Jarange : मराठा शांतता रॅलीला कुणाचे गालबोट, कोण घालणार खोडा? मनोज जरांगे पाटलांचा कुणाकडे रोख

| Updated on: Jul 06, 2024 | 9:17 AM

Maratha Peace Rally : मराठा समाजाची आजपासून शांतता रॅली सुरु होत आहे. पण या रॅलीला काही जण गालबोट लावण्याची आशंका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या राजकीय नेत्याचे नावच थेट घेतले आहे.

Manoj Jarange : मराठा शांतता रॅलीला कुणाचे गालबोट, कोण घालणार खोडा? मनोज जरांगे पाटलांचा कुणाकडे रोख
शांतता रॅलीला कुणाचे गालबोट
Follow us on

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणासाठी, सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी आता आक्रमक वाटचाल करण्यात येत आहे. त्यासाठी मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला आजपासून हिंगोली येथून सुरुवात होत आहे. मराठा समाजाची एकजूट दाखविण्यासाठी ही रॅली काढण्यात येत आहे. पण या रॅलीत काही जण अशांतता माजविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांनी राज्यातील बड्या नेत्यावरच या रॅलीला गालबोट लावण्याचा आरोप केला आहे.

पाच टप्प्यात रॅली

हिंगोलीपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात होत आहे..5 टप्यात ही जनजागृती रॅली वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आरक्षणासाठी मराठा बांधवानी आतां बाहेर पडावे आणि यात शांततेच्या मार्गाने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवून द्यावी अशी विंती जरांगे पाटील यांनी केली आहे. आपला एक दिवस करोडो मराठा बांधवाच्या मुलाचं भविष्य उज्वल करणारा आहे, असे आवाहन त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

या आहेत मागण्या

संगे सोयरे अंमलबजावणी झाली पाहिजे. हैद्राबाद गॅजेट लागू झालं पाहिजे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे या मागण्यासाठी शांतता रॅली काढण्यात येत आहे. कोणताही ही नेता अंतरवली येथे आला तरी मी त्याचा होणार नाही. आपण शेवटपर्यंत समाजाचाचे राहणार आहोत. त्यामुळे किती आले किती गेले तरी समाजाच्या मनात काही शंका नाही. मराठ्याची कुणबी ही पोट जात का होत नाही यावर अशोक चव्हाण यांच्या सोबत चर्चा झाली ते म्हणाले आम्ही सरकारशी बोलून तोडगा काढतो, अशी माहिती त्यांनी दिली.

छगन भुजबळ पुन्हा टार्गेट

मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला कोणतेही गालबोट लागणार नाही. मात्र छगन भुजबळ यांना एकमेकांच्या पुढे आंदोलन उभा करून खुन्नसचीपणा दाखवण्याचा नाद असल्यामुळे ते कोणत्याही कार्यकर्त्याला सांगून रॅलीमध्ये गालबोट लावू शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावं आणि छगन भुजबळ हे सरकारमध्ये असल्यामुळे जर काही घडलं तर त्याला मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री हे देखील जबाबदार असतील.समाजात शांतता सुव्यवस्था राहावी हे सरकारचं काम आहे मात्र ते काम आम्ही करत असल्याचे ते म्हणाले.

सर्व पक्षीय नेत्यांना आव्हान

या रॅलीतून ताकत दाखवून इशारा द्यायचा नाही, तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र यायचं आहे. आपला समाज एक करायचा आहे. माझ्या पाठीशी ताकदीने उभा राहा. कोणत्याही पक्षातील मराठा बांधवाला आरक्षणाची गरज आहे, त्यामुळे या लढ्यात सर्वांनी एकत्र यावे. मराठा समाजातील नेत्यांनी ही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आरक्षणाच्या सहभागी व्हावा नेता आपल्या मुलांचं वाटोळ होईल आरक्षण मिळेपर्यंत कायम संघर्ष सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शंभूराज देसाई यांच्यावर आमचा विश्वास आहे 13 तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय घेतील. आमच्या सगळ्या मागण्या ते मान्य करतील. मात्र आम्ही देखील सावध आहोत. आपण गाफील राहिलो तर आरक्षण मिळणार नाही. आपल्याला एकजूट दाखवावी लागेल आरक्षण असून देखील काही लोक कट्टर झाले आहेत त्यामुळे आपणही कट्टर राहिल पाहिजे माझी जात खोट्या केसेस ला घाबरणारी नाही, असा इशारा त्यांनी दिला.