Manoj Jarange : संतोष देशमुखचा संसार मोडला, राखरांगोळी केली, त्याच्या कुटुंबाची हाय आणि तळतळाट तुम्हाला लागेल; मनोज जरांगे संतापले

| Updated on: Jan 15, 2025 | 12:33 PM

Manoj Jarange big Statement : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचं कुटुंब अनाथ झालं. त्याचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, असा संताप मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्या भावना अनावर झाल्या.

Manoj Jarange : संतोष देशमुखचा संसार मोडला, राखरांगोळी केली, त्याच्या कुटुंबाची हाय आणि तळतळाट तुम्हाला लागेल; मनोज जरांगे संतापले
मनोज जरांगे पाटील, संतोष देशमुख
Follow us on

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचं कुटुंब अनाथ झालं. संतोष देशमुखचा संसार मोडला, राखरांगोळी केली, त्याच्या कुटुंबाची हाय आणि तळतळाट तुम्हाला लागेल, असा असा संताप मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्या भावना अनावर झाल्या. त्यांनी यावेळी त्यांनी लाभार्थी टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन केले.

यापेक्षा दुसरी गंभीर बाब कोणती?

देशमुख कुटुंबाला न्याया मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आत्महत्या करण्याची वेळ येत असेल यापेक्षा दुसरी गंभीर बाब असू शकत नाही, असा रोष जरांगे यांनी व्यक्त केला. ते आंतरवाली सराटीत माध्यमांशी बोलत होते.

हे सुद्धा वाचा

आता दोषारोपपत्रात गडबड होऊ देऊ नका

त्यामुळे वाल्मीक कराड वर मोक्का लावणे, 302 लावणे आणि ही केस अंडरट्रायल चालवणे आवश्यक आहे. वाल्मीक कराड याला जागा बळकवणे. मारामार्‍या करणे. चोऱ्या करणे, छेडछाड करणे याप्रकरणातही मकोका लागला पाहिजे. आणि तपास करणाऱ्या अधिकार्‍यांकडून चर्जशीट मध्ये कुठल्याही प्रकारची हेराफेरी होऊ नये म्हणून याची काळजी गृहमंत्रालयाने घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जरांगे यांनी केले.

या प्रश्नांची प्रशासन उत्तर देणार का?

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनावर तोफ डागली. प्रश्नांच्या फैरी झाडल्या. हा माणूस आतापर्यंत पिक्चर मध्ये का नव्हता? अशी शंका व्यक्त करत वाल्मिक कराड याने इतके मोठे साम्राज्य कोणासाठी जमा केले, असा रोकडा सवाल त्यांनी केला.

ED ची नोटीस असताना या संस्थेला चौकशी करायला इतके दिवस का लागले? हे गंभीर विषय आहेत आता. कित्येक हत्या झाल्या याचा आतापर्यंत तपास का लागला नाही, हे गृह विभागाला आमचे प्रश्न आहेत. वाल्मीक कराड यांनी जी माया जमवली ती कोणासाठी जमवली? हे शोधणे खूप गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

काही खोटा नाटा तपास झाला, तर तो आम्हाला मान्य असणार नाही. कोणी आरोपीला सोडा म्हणून आंदोलन करत असेल तर, तर या राज्यातील सर्व लोक संतोष देशमुख एका जागेवर येऊ शकतात, हे मुख्यमंत्री यांनी लक्षात ठेवावे. वाल्मीक कराड सारख्या साध्या माणसाने इतकी माया, राज्यात जमवली नसेल, आणि मुख्य कार्यक्रमात न दिसणारा वाल्मीक कराड, ज्या ठिकाणी कॅमेरे नसतील त्या ठिकाणी दिसायचा, वाल्मीक कराड यांनी समोर येऊ नये असे काही ठरवले होते का? हे मुख्यमंत्री यांनी लक्षात ठेवावे, असे जरांगे म्हणाले.

नंजय मुंडेंवर प्रहार

आता हे नेटवर्क, आणि ज्याला मकोका लागला आहे, आणि त्याने ही माया कोणासाठी जमवली, वाल्मीक कराड यांनी धनंजय मुंडे साठी पाप केले, धनंजय मुंडे मोकळा राहतो का? असा सवाल करत इनकम टॅक्सच्या रेड तातडीने पडल्या पाहिजेत आणि ईडी कडून पण चौकशी झाली पाहिजे, कारण चर्जशीट मध्ये सर्व येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

संतोष देशमुख यांचा खून झाला, त्यावेळी या लोकांनी कोणा कोणाला फोन केले? ज्याला मकोका लागला त्याने केले असतील तर त्याचा सीडीआर पाहिजे. हे चर्जशीटमध्ये आले पाहिजे, हे मी मुख्यमंत्री यांना जाहीर सांगतो. आणि ज्या वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागला आहे, यांनी कोणा कोणाला फोन केले, हे चर्जशीट मध्ये आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

राज्य सरकारला इशारा

मुख्यमंत्री म्हणाले वाल्मीक कराड कोण्या गुन्ह्यात आढळुन नाही आला, तर हे राज्यासाठी घातक असेल, असे तुमचे स्टेटमेंट आले आणि चार्जशीट मध्ये काही झाले, आणि हा त्यात आढळून आले नाही, तर हे राज्यासाठी घातक असेल. धनंजय मुंडे यांनी लाभार्थी टोळीला आंदोलन करण्यासाठी सांगितले असेल, आणि तुम्ही थातूर मातूर चौकशी कराल, तर राज्य यापेक्षा दहा पटीने रस्त्यावर येईल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.

वाल्मीक कराड हा, 302 आणि मकोका मधून बाहेर जाता कामा नये, वाल्मीक कराड पूर्ण सडला पाहिजे आणि याला जन्मठेप झाली पाहिजे. मुख्यमंत्री यांनी प्रामाणिकपणे काम करावे, आणि यांना कोणालाही सोडण्यात येऊ नये, असे ते म्हणाले.

जरांगे यांचा संताप

मी वाल्मिक कराड यांच्या आई बद्दल बोलणार नाही, कारण आईची माया ममता कशात तोलता येत नाही, त्या मायेला कोणता तराजू असू शकत नाही, जी आंदोलन करणारी टोळी आहे ती लाभार्थी आणि धनंजय मुंडे यांची टोळी आहे, संतोष देशमुख यांना न्याय मागणे जातीयवाद आहे का?

तुमचा फक्त माणूस गुंतला तर तुम्हाला झोप येत नाही, तर त्या संतोष देशमुख यांच्या आई वडिलांचे काळीज काय म्हणत असेल..?त्यांच्या छोटया लेकरांचे काळीज काय म्हणत असेल..? तुम्हाला तुमचा माणूस दिसतो, तुमच्या माणसांमुळे त्यांच तर लेकरू पण दिसत नाही आणि तुम्ही याला जातीयवाद म्हणता? असा सवाल त्यांनी केला. संतोष देशमुख यांचा तुम्ही सुखी संसार मोडला, राखरांगोळी केली, त्याची हाय आणि तळतळाट तुम्हाला लागणार आहे, असा संताप व्यक्त केला.