मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. एका वर्षात त्यांच्या आंदोलनाने राज्यात मोठी हालचाल घडवली आहे. या आंदोलनाचा फटका लोकसभेला दिसून आला आहे. मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण द्यावे आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून समाजाला वाट पाहावी लागली आहे. सरकारने कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
16 सप्टेंबर रोजीपासून उपोषण
मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या एक दिवसाअगोदर 16 सप्टेंबर रोजीपासून उपोषणाची सुरुवात करणार आहे. ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत अंतरवाली सराटीत मोठ्या घडामोडी घडल्या. मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. त्यांचा निरोप घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर धनंजय मुंडे हे सुद्धा अंतरवाली सराटीत दाखल झाले आणि त्यांची भेट घेतल्याची बातमी येऊन ठेपली. त्यानंतर आता कोणती खलबतं झाली आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी अचानक उपोषणाचे हत्यार उपसले हे समोर आलेले नाही.
मी शहीद होण्यास तयार
यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा सामाजातील तरुणांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल न उचलण्याचे आवाहन केले. कोणत्याही कारणामुळे आत्महत्या करु नका, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले. तरुणांनी संयम ठेवावी. आरक्षणाचा प्रश्न सुटण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी मी मरायला तयार आहे, काही आमदार माझे तुकडे करणार असे म्हटले, मी शहीद होण्यास तयार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
नेत्याची धडपड निवडणुकीसाठी
नेत्यांना मराठा आरक्षणाशी काही देणे-घेणे नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यांना त्यांच्या पक्षाचा अजेंडा मोठा करायचा आहे. नेत्यांची धडपड निवडणुकीसाठी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी अंतरवाली सराटीत उपोषण सोडतानाच जरांगे पाटील यांनी सरकारला सप्टेंबरची मुदत दिली होती. तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा आग्रह धरला होता. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा त्यांनी उपोषणाचा निर्णय जाहीर केला आहे.
ही तर फडणवीसांची शाळा
ते काही बोलत हे सगळं राजकीत स्टेटमेंट आहे. हा माझ्या विरोधात रचलेला ट्रॅप आहे. त्याच्या कडून लिहून आना हा राजकीय प्रश्न नाही का ? हे सगळं देवेंद्र फडणवीस यांची शाळा आहे, फडणवीस यांना मराठयांचे आमदार हाताशी धरून हे आंदोलन फोडायच आहे. आता माहीत अशी मिळाली की, एका आमदाराला पुढे घालून बाकीचे आमदार सपोर्ट करणार आहत, हे देवेंद्र फडणवीस घडवून आणत आहेत.
माझ्या कडे पाच सहा आमदार आले म्हंटले तुमच्या आणि फडणवीस याच्यात समन्वय घडवून आणायचा आहे. नंतर मतदारसंघात जाऊन माझ्या विरोधात बोलायला लागले.
मी समाजासाठी मागणी करतो म्हटल्यावर मला कोणी तरी विरोध करणारच न, लोकांना तुम्हाला पण निवडून दिलीच की, ज्या लोकांनी तुम्हाला सोडून मतदान केलं त्याला तुम्ही मारायला लागलेत. तुम्हाला पक्षाकडून बोलावं वाटत मला माझ्या समाजाकडून बोलावं लागत. हातावारे करून जरांगे यांनी राजेंद्र राऊत यांना डिवचलं.
आज पासून मी राजेंद्र राऊत वर बोलणार नाही, अनेक आमदार एक झालेत हे मला माहित झालं. देवेंद्र फडणवीस यांनी मराठयांच्या विरोधात एक टीम तयार केली आहे. आता हे चार चार हजार कोटीचे याना काम दिली असतील त्याच्या वर फडणवीस च प्रेशर आहे. तू जर मराठा आंदोलनाच्या विरोधात नाही बोलत तर तू जेल मध्ये जाशील असं प्रेशर आहे आमदारावर. का देवेंद्र फडणवीस याच ऐकून तुम्ही मला घेरलं आहे.मी शेतकऱ्यांना चा मुद्दा आता सोडणार नाही. त्या मुळे याची तडफड होत आहे. आतून किती आमदार एकत्र आले हे सगळ्यांना कळत. देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेणार व मराठा आंदोलनाच्या विरोधात बोलणार आमदार गेला म्हणून समजा. वाहून गेलेल्या जनावरांची पोस्टमोटर्न करा म्हणत आहेत. कसं करायचं आता पोस्ट पोस्टमोटर्न, असा सवाल त्यांनी केला.
छगन भुजबळ यांच्यावर निशाणा
त्याला आता काय काम राहील आहे.मी तज्ञ आहे नाही, फडणवीस यांनी हा मुकादम उभा केला आहे. तो मोठा मुकादम आहे. लहान मोठे खूप मुकादम आहेत. मी येडा वाहे पण गरिबांसाठी काही न काही करतो ना भुजबळ. त्याला आता काही काम नाही, काम तर पाहिजे नाही काही, असा टोला त्यांनी भुजबळ यांना लगावला.