Manoj Jarange : लोकसभेच्या निकलादिवशी उपोषणाचे उपसले हत्यार; मतदानाच्या पाचव्या टप्प्यासाठी जरांगेंचे काय आवाहन

| Updated on: May 19, 2024 | 12:20 PM

Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाच्या दिवशी, 4 जून रोजी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषण सुरु करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी हे आवाहन केले आहे.

Manoj Jarange : लोकसभेच्या निकलादिवशी उपोषणाचे उपसले हत्यार; मतदानाच्या पाचव्या टप्प्यासाठी जरांगेंचे काय आवाहन
मराठा आरक्षणाचा गेम होणार?
Follow us on

मराठा आंदोलनाचा पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालादिवशीच, 4 जून रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरु होईल. मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. उपोषण स्थळी राज्यातील गरजवंत समाज एकत्रित जमणार आहे.गरीब समाजासाठी माझा लढा सुरू आहे. या लढ्यात सर्वच समाज एकत्रित येणार आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

आंदोलनामागे कोणी नाही

माझ्या आंदोलना मागे कोणीही नाही. फुस लावण्याचा तर प्रकार लांबच राहिला. काहीही कारणं जोडू नका. इथ मराठा एक झालेला आहे. आंदोलन हे सरकारच्या फायद्याचे होत असतात. मात्र माझे आंदोलन समाजासाठी आहे. त्याचा फायदा समाजाला झाला आहे. सरकार आणि विरोधी पक्षाला कुठलाच फायदा झाला नाही, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मतदानापूर्वी केले हे आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देखील मराठा समाजाने ताकदीने मतदान करा. मराठा समाजाने लेकरं डोळ्या समोर ठेवून निवडणुकीत मतदान करा. नाशिकच्या उमेदवाराला माझा पाठिंबा नाही. माझा कोणालाच पाठिंबा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजाने मला उपोषण करू नये असे सांगितले. मात्र मला समजालाच न्याय द्यायचे आहे म्हणून उपोषण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंकजा-धनंजय मुंडे यांच्यावर आरोप

  • मी जातीवाद केला नाही. मी ओबीसी मराठा वाद केला नाही.बीड मध्ये मुंडे भावंडांनी मला हिणवले. सप्ताहात त्यांनी तसे प्रयोग केले आहे. आष्टीत परळी येथे माझ्याबद्दल त्यांनी बोललं आहे. मी सहन केले. मराठा समाजाला मी शांत राहण्याचे आवाहन करतो. महिनाभर समाजाने शांत राहिले पाहिजे.बीड पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळणार नाही. पालकमंत्र्यांपासून त्यांचे सर्वच लोक प्रशासनात आहेत. त्यांचे पोलीस त्यांना निवडणुकीत मदत करत होते असा गंभार आरोप जरांगे पाटील यांनी केला.
  • पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे समाजाला फुस लाऊन मला धमक्या देण्याचे काम करत आहेत. माझा कोणत्या पक्षाला मदत होत असेल तर मी काय करू? मला बीडमध्ये येऊ देणार नाही असं म्हंटले, मग तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचे आहे, त्याच भान असू द्या. पंकजा मुंडेना आम्हीच मदतीला येणार आहोत. त्यांनी अपमानास्पद वागू नये, असे आवाहन त्यांनी केले.