जालन्यातील वडीगोद्री गावात ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण करण्यात येत आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मंडल आयोग तयार होत असताना शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. हे पवार का जरांगे यांच्याबाबत बोलत नाहीत? शरद पवार हे राज्यातील महाजातीयवादी आहेत. पवारांच्या आमदारांचा बेस धनगर आहे. आमच्याबाबत जे पक्ष आमदार बोलले नाहीत, उद्धव ठाकरे बोलले नाहीत. ओबीसी फक्त ओबीसींना मतदान करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
काल रात्री मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. यावेळी दोन्ही बाजूने घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावर लक्ष्मण हाके यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी कधी ओबीसींच्या भाषा येत नाही. त्यांच्यावर आरोप करणं मला वावगं वाटत नाही. रात्री इथून झुंडी जायच्या. त्यांनी घोषणा दिल्या. घोषणांनी सुरुवात त्यांनी केली. मग अॅक्शन- रिअॅक्शन सुरू झाली, असं ते म्हणाले.
मनोज जरांगे याने कायदा बिघडवल्यास जशाचं तसं उत्तर मिळेल. राज्य सरकारला कोणताही अधिकार नाही हा केंद्राचा अधिकार आहे. संसदेचा अधिकार मुख्यमंत्री यांनाच्याकडे वर्ग झाला आहे का? राणे समिती गायकवाड आयोग,खंडपीठाने दिलेलं जजमेंट वाचलं आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या खासदारांकडे दारूचे किती धंदे आहेत? संदिपान भुमरे यांची काय स्पेशालिटी आहहे दोन नंबरचा धंदाच आहे ना…. संदिपान भुमरे संसदेत काय बोलतील, ते दारूचे गुट्टे चालवतात. स्पेलिंग तरी लिहिता येते का तुला भुमरे? मुख्यमंत्री तुमचा सहकारी आला दारूचा धंदा करावा वाटतो तो आमच्या प्रश्नाबादल काय बोलेल? शंभुराज देसाई काल बोलल्याननंतर तुम्हला आम्ही आठवलो का? हाच सल्ला जरा जरांगे यांना द्या… याचं देसाई यांनी जरांगे यांना सलाईन लावायला लावलं. त्याचं उपोषण रात्रीच संपलं. जरांगे तुझं आणि धनगर यांचं भांडण नाही. तर मग पंकजा मुंडे जानकर यांना पराभूत करायला का गेला?, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे.