जालना हे राज्यातील मराठा आरक्षणाचेच नाही तर ओबीसी आरक्षणाचे पण केंद्रबिंदू ठरत आहे. मराठा आरक्षण, ओबीसीत समावेश, सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबाजवणी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते. सरकारच्या शिष्टाईने उपोषण स्थगित झाले. पण दुसरीकडे आंतरवाली सराटीपासून हकेच्या अंतरावर ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु आहे. वडी गोद्री येथे उपोषण सुरु आहे. ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी येथे भेट दिल्यानंतर तोफ डागली.
जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल
यापूर्वी गेल्यावर्षी मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश शेंडगे, छगन भुजबळ असा कलगीतुरा पाहायला मिळाला होता. आता शेंडगे यांनी पुन्हा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे पाटील यांनी जो ओबीसी आरक्षणावर हल्ला केला आहे त्या उपोषणाला विरोध करण्यासाठी आम्ही उपोषण करू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
शेंडगे यांच्या प्रमुख मागण्या काय?
सरकारने ओबीसीवर होतात असलेला हल्ला थांबवावा आणि कुणब्यांचे देत असलेले दाखले सरकारने थांबवावे आणि जीआर रद्द करावे.
सग्या सोयऱ्याबाबत जी अधिसूचना काढली आहे ती सरकारने मागे घ्यावी.
सरकारला विनंती आहे ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागला हे सांगावे.
नाहीतर या उपोषणाचा वनवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही.
सरकारसह विरोधकांना विचारला जाब
यावेळी शेंडगे यांनी राज्य सरकारसह विरोधकांना ओबीसी आरक्षणावरुन जाब विचारला. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्व नेते म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि जरांगे म्हणतात 80 टक्के मराठे ओबीसीत घुसवले, याकडे शेंडगे यांनी लक्ष वेधले.
चून चून के गिरायंगे
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मंत्र्यांची लाईन लागली होती. पण आमच्या उपोषणाला भेट द्यायला एक मंत्री देखील आला नाही, अशी खंत शेंडगे यांनी बोलून दाखवली. येणाऱ्या विधानसभेला आम्ही आव्हान देतो जो आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सग्या सोयऱ्याचा आदेश काढेल त्यांचे आमदार आम्ही चून चून के गिरायांगे, असा सज्जड दम त्यांनी भरला.