अजित पवार यांचं राजकारण जातीय आहे का?; राज ठाकरे काय म्हणाले?

| Updated on: Aug 10, 2024 | 3:29 PM

Raj Thackeray on Ajit Pawar : राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज ते जालन्यात आहेत. तिथं माध्यमांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्याबाबत महत्वाचं विधान केलं आहे. मराठा आरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

अजित पवार यांचं राजकारण जातीय आहे का?; राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे, अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यानिमित्त सध्या जालन्यात आहेत. तिथे माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत महत्वाचं विधान केलं आहे. अजित पवार कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत. त्यांचं कधी विधान ऐकलं नाही. त्यांच्यासोबत मतभेद नाही. पण ते जातीच्या राजकारणात अडकले नाही. मी त्यांचं तसं विधान कधी ऐकलं नाही. जातीचं राजकारण महाराष्ट्र आणि देशाला नवीन नाही. पण या प्रकारचं राजकारण कधी पाहिलं नसेल, असं राज ठाकरे म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. जरांगेंचं आंदोलन सुरू असताना तिथे मी बोललो होतो. तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. राज्यातील मराठा समाजाचा विषय येत नाही. मग इतर राज्यांचाही विषय येतो. त्यामुळे हा विषय काढायला कोणी तयार नाही. माझं सांगणं समाजाला आहे. हे विष कालवत आहेत. त्यांना तुम्ही थारा देऊ नका. एवढं माझं म्हणणं आहे. साडे तीन महिन्यानंतर हे कोणी नसणार. यांचं काम अटोपलेलं असेल, असं ते म्हणाले.

मराठवाडा दौऱ्यावर म्हणाले…

सोलापूरपासून दौऱ्याला सुरुवात केली. साडेतीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहेत. दिवाळीनंतर होतील असं चिन्ह आहे. असं आज तरी वाटतंय. त्यादृष्टीने माझा मराठवाड्यातील पहिला दौरा आज संभाजीनगरात पूर्ण होतोय. २० तारखेला माझा विदर्भ दौरा सुरू होतोय. मी दौरा आवरता घेतला अशा बातम्या तुमच्याकडे आल्या. कुठला आवरता घेतला माहीत नाही. पण माझा दौरा पूर्ण झाला. मधल्या काही गॅप होत्या. हिंगोलीला राहणार होतो. पण तिथून मी परभणीत आलो. सोलापूरपासून सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसापासून मराठवाड्यातील राजकारण आणि वातावरण पाहत होतो, ऐकत होतो. त्याची प्रचिती आली, असं राज ठाकरे म्हणाले.

भाजपला ते खोडता आलं नाही- राज ठाकरे

भाजपच्या चार पाच लोकांनी संविधान बदलणार सांगितलं. काही मूर्ख असतात. पण ती गोष्ट भाजपला हे खोडता आलं नाही. शिवाजी पार्काच्या भाषणात मी म्हटलं होतं संविधान बदलणार नाही हे स्पष्ट करा. पण त्यांना खोडता आलं नाही, असं राज ठाकरेंनी जालन्यात बोलताना म्हटलं आहे.