राज्यात सध्य महायुती वि महाविकास आघाडी असं राजकीय वातावरण असलं तरी सत्ताधारी आणि विरोधक हे बाहेर एकमेकांशी खेळीमेळीनेही बोलत असतात. सौहार्दाचं वातावरण असतं. असंच काहीस दृश्य मुंबईतील एका कार्यक्रमात दिसलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. विविध विषयांवर बोलताना काहीश्या सीरियस झालेल्या या मुलाखतीत नंतर रॅपिड फायर राऊंडही आला, तेव्हा जयंत पाटील यांनी पडणवीस यांना काही थेट तर काही तिरके प्रश्नही विचारले, पण मुख्यमंत्र्यांनी त्या खुबीने उत्तरं दिली. या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या, मात्र त्यांच्यासमोरच जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक फुलटॉस प्रश्न टाकला, पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं,त्यांनी थेट सिक्सरच मारल्याचे दिसले.
तुमचे आवडते गायक आणि आवडती गायिका कोण ?असा तो सवाल होता, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय उत्तर दिलं जाणून घेऊया. लोकमतच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. बायकोसमोर असे प्रश्न विचारता का ? असं मिश्किल उत्तर फडणवीस यांनी दिलं. पण आपले आवडते गायक किशोर कुमार आणि आवडती गायिका या अमृता फडणवीस असल्याचं सांगत त्यांनी थेट सिक्सर मारली.
जयंत पाटील यांची देवेंद्र फडणवीसांसोबत रॅपिड फायर
प्रश्न : बँटेगे तो कँटेगे की दोघापैकी तर पढेंगे तो बँढेगे एक निवडा ?
उत्तर : आपण एक राहिलो तर विकास होईल त्यामुळे बटेंगे तो कटेंगे
प्रश्न : अमित शाह आणि मोदी कुणासोबत कम्फर्टेबल ?
उत्तर : तुमच्यासोबत माझा कम्फर्ट जास्त. मोदी आणि शाह मोठे आहेत.
प्रश्न : तुमचा आवडता पोशाख कोणता, जॅकेट की हुडी काय आवडतं ?
उत्तर : माझा आवडता पोशाख जॅकेट आहे, पण कधी कधी हुडी घालायलाही मला आवडतं
प्रश्न : अजित पवार कि एकनाथ शिंदे दोघापेकी जवळचं कोणं ?
उत्तर : दोघेही माझ्याजवळचे आहेत. एकनाथ शिंदेसोबत माझी आधी दोस्ती झाली. तर अजित पवारांसोबत नंतर दोस्ती झाली.पण दोघेही माझ्या जवळचे आहेत.
प्रश्न : नागपूर कि मुंबई ?
उत्तर : नागपूर
प्रश्न : आवडता गायक आणि गायिका कोण ?
उत्तर : बायकोसमोर असे प्रश्न विचारता, माझे आवडते गायक किशोर कुमार आणि माझी आवडती गायीका अमृता फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरानंतर एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.