नंदुरबार: गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा झालेल्या आरोपावरुन ढवळून निघाले आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे प्रकरण सुर्या एवढ स्वच्छ आहे टोला त्यांनी लगावला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आव्हाडांनी आधीच्या लोकांना केलेली मारहान हे काय आहे. आणि त्यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला.
आधीच्या महाविकास आघाडी सरकाने अडीच वर्षात नारायण राणे, मला, राणा दांपत्य, कंगणा राणावत यांच्यावर केलेली कारवाई ही सुडबुद्धीने झालेली नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गिरीश महाजन यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्यावेळी टीका करताना ते म्हणाले की, लोकांनी पाहीले आहे की, तुम्ही महिलेला दोन्ही हात धरुन कसं ढकलला आहे ते. त्यामुळे आव्हाडांवरील कारवाई ही नियमानुसार झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी टीका करताना राष्ट्रवादीचेच नेत्यांवरही त्यांनी निशाणा साधला. काल जळगाव जिल्हा दूध संघावर झालेली कारवाईबाबतही त्यांनी टीका टिप्पणी केली.
त्या दूध संघातील पहिली अटक करुन कारवाईला सुरू झाली असून त्यामधील लिमये यांना अटक केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, तुमच्याच तक्रारी आणि तुमचीच चौकशी सुरु असल्याचा जोरदार हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केला.
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, तसेच राजकीय भावनेने कोणतीही चौकशी होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, एकनाथ खडस यांना सर्व पदे घरात पाहीजे. त्यांचे संपुर्ण कुटुंब तूप आणि लोणी खात असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.
यावेळी त्यांनी खडसे यांच्यावर टीका करता करता त्यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावरही आरोप केले आहेत.
खासदार संजय राऊत आणि अजित पवार यांनी मध्यवर्ती निवडणुकांविषयी बोलल्यावर त्याविषयी बोलतानाही त्यांनी थेट भाष्य करत सांगितले की, आमच्याकडे 167 लोक आहेत.
त्यामुळे मध्यावर्ती निवडणुकांचा मुद्दा हा हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री मंडळावर विचारले असता मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटात आता 18 पैकी 13 खासदार झाले आहेत आणि येत्या दोन पाच दिवसात पंधरा होतील.